होळी-रंगपंचमी-कविता-2

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:38:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      होळी-रंगपंचमी
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

रंगात रंगाच्या...

तिला

रंगाचा तिटकारा होता

म्हणून

ती घरात बसून राहिली आणि

सर्व संपल्यावर

बऱ्याच वेळाने बाहेर पडली..!!

रस्ते सुनसान होते
पण जागोजागी रंगांचे अस्तित्व ठळकपणे दिसून येत होते
लाल, निळा, पिवळा, हिरवा, गुलाबी
काही सुकलेले तर काही अजूनही ओले होते..!!

ती

दबकत सावरत चालत राहिली
रंगहीन रस्ता शोधत राहिली
पण तिच्या लक्षात आले नाही की
त्याच रंगाने तिची पावले नकळत रंगत गेली..!!

--सुनिल पवार
-------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================