होळी-रंगपंचमी-कविता-5

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:41:57 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      होळी-रंगपंचमी
                                     --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

हातात माझ्या रंग सामोरी तू आलेली आहेस
रंगवावा हा प्रसंग तू हसून दाद दिलेली आहेस

पण तेवढ्यात दिसतो तुझ्या गालावरील रंग गुलाबी
हातचा माझ्या रंग म्हणतो नको बिघडवुस तो थाट नवाबी

विचार हाच करेपर्यंत आकाश निळेशार पार दिसते
उडालेल्या निळ्या रंगात दूरपर्यंत तू अदृश्य होत नाजूक पळते

--अक्षय कदम
-------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================