होळी-रंगपंचमी-कविता-7

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:44:34 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     होळी-रंगपंचमी
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

रंगांनी रंगलेले आयुष्य हे सारे रंग आनंदाचे पुसुनी घावा
दुःखाचा तो रंग ओसंडू द्यावा
सुखाचा क्षण कधी सौम्य तर कधी गडद रंगांप्रमाणे आयुष्यात येतात प्रसंग
सामोरे जाऊन उधळून द्यावा

तो रंग रंगाना जशी असते स्वतःची ओळख तशी आयुष्यालाही असते
रंगांची निखळ देऊन शुभेच्छा
रंगपंचमीला सण साजरा करुया आजच्या घडीला

रंग बदलू ही दुनिया रंगांशी कसं खेळायचं
एकच की अवघा एक ज्याचे त्याने ठरवायचं

रंग हेतू राजकारण समाजकारण बेरंग
प्रत्येक झेंडा भिन्न रंगी स्वार्थ सर्वार्थ अनुरंग

चढे माज धन रंगाचा सावकारा मनी तरंग
वाढे साज भक्ती रंगाचा सूखे भेटतो पांडुरंग

भांग पिऊन रंगारंग शिवीगाळ करण्यापरी
रंगपंचमी आत्मरंगी रंगवून करा साजरी

-सतिश कुलकर्णी
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================