होळी-रंगपंचमी-कविता-8

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:45:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    होळी-रंगपंचमी
                                   --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

होळी आली रे बघ होळी आली विविध रंगाची झोळी घेऊन आली

मनातला राग काढून टाका सांगत आला आहे लाल रंग
सकारात्मक विचार करून वाग बोलतो आहे हिरवा हिरवा रंग
तुझ्या विचारात क्रांती करण्या आली

सर्वाना आपल्यात सामावून घे संदेश देत आहे बघ निळा रंग
इतरांच्या दुःखाचे निवारण कर आदेशाने सांगतो आहे काळा रंग
तुझ्या वागण्यात बदल करण्या आली

न डगमगता संकटाला तोंड दे प्रेरणा देत आहे तुला केसरी रंग
लागतीसाठी अविरत चालत राहा प्रोत्साहित करतोय पिवळा रंग
होळी आली व होळी आली

--नासा येवतीकर
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================