होळी-रंगपंचमी-कविता-9

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:47:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     होळी-रंगपंचमी
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

आयुष्य आपले सारे, रंगपंचमीचा सण,
रंग खेळा आवडीने, जिवेभावे मनोमन..!१!

पेटी भारी ही रंगाची, वाहते हो ओसंडून,
निवडून तुम्ही घ्या हो, नका करू आनमान..!२!

रंग खेळता जीवनी, कधी कुठला सांडेल,
नाही येणार अंदाज, कधी कसा मिसळेल..! ३ !

चित्र रंगवू आपले, हर्षभरे आनंदात,
नको रंगाचा बेरंग, दुसऱ्याच्या जिंदगीत..!४!

नवरंगी मोर पिस, प्रति क्षण आयु जणू
जप हृदयी नित्य, प्रिय राधा कान्हा वेणू..!५!

रंग उधळूया चला, सुख समृध्दी वाढवू
सप्तरंगी इंद्रधनू, सर्व जगात रंगवू..!६!

--गणेश गंगाधरराव शिवलाड, परभणी.
---------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================