होळी-रंगपंचमी-कविता-16

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:56:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     होळी-रंगपंचमी
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

फक्त जळत न्हवती होळी तर जळत होता अहंकार पेटणाऱ्या लाकडा सोबत मिटत होता अंधार आगीच्या ज्वालेतून आशेची किरणे दिसत होती
अन आमच्या वस्तीत होळी जळत होती

मी गेलो मोहून पाहता माझ्या सजनेचा शृंगार होळीच्या आगेहून तप्त जणू ती अंगार नमस्कार त्या होळीला ती लांबून घालत होती
अन आमच्या वस्तीत होळी जळत होती

ती वाढत गेली पुरणपोळी अन वाढत होता माझ्या पोटाचा आकार वाटले मनास झाले पुरे आता !, पण देता ना आला तिच्या प्रेमाला नकार होळीच्या धुरामध्ये ती नवीन श्वास भरत होती
अन आमच्या वस्तीत होळी जळत होती

केला होळीने आज माझ्यातील दृष्टाचा संहार जन्मलो मी नव्याने भरून नव तेजाची फुंकार गगनभेदी ती ज्वाला आता शांत होत होती
अन आमच्या वस्तीत होळी जळत होती

--सुरेश गोविंद पवार
------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================