होळी-रंगपंचमी-कविता-17

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:57:48 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     होळी-रंगपंचमी
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

"होळी" होळीचा सन असा अनोखा, दुष्प्रवृत्तिंना जाळी...
मनामनाचे रंग उमलते, सुख-आंनदाची होळी..

नवचैतन्याचे रंग पसरती, दिशांत उमटे लाली..
रंग उधळती अवती-भवती, कुण्या देह कुण्या गाली..

कुणी टाकतो रंग कुणावर, कुणी टाकतो पाणी..
रस्त्यावरती तरूनाईची बेधुंद वाजती गाणी..

कुणी नाचतो, कुणी खेचीतो, कुणी माखतो माती..
भिन्न न उरले रंग कोणते, मीसळुनी गेलीत नाती..

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================