तुझ्या विना....

Started by sarveshw, September 20, 2010, 07:46:18 PM

Previous topic - Next topic

sarveshw

एकटेपणा म्हणजे काय याचा अर्थ सांग जरा,
हीच एक आशा घेऊन जगायचं का मला?
का सोडायला लावलीस मला तुझी साथ,
आता जगायचा अर्थ तरी सांगून जा जरा..

इतकं तरी काय कमी वाटला माझ्या हृदयी,
किती तरी सांग वाटलो मी निर्दयी,
अजून किती दिवस जगू मी असा माझ्या घरा,
आता जगायचा अर्थ तरी सांगून जा जरा..

चाल्लीस,
चाल्लीस मला वाऱ्यावर सोडून,
पाण्याच्या शोधातच जणू गेलो मी बुडून,
कल्पनेनेच उसळून आल्या साऱ्या शिरा,
आता जगायचा अर्थ तरी सांगून जा जरा..

निघालीस पाठ दाखवून मला,
थोडं अजून काही सांगायचा होतं तुला,
काहीतरी विचारायचय थांब जरा,
आता जगायचा अर्थ तरी सांगून जा जरा..
----------सर्वेश वायंगणकर--------- :)

PRASAD NADKARNI

kavita chan aahe
pan hi virah kavite madhye post karayala havi hoti