हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-२.५९-दोन वाजून एकोणसाठ मिनिटे

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 06:16:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                            --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "2:59"- "२.५९"- "दोन वाजून एकोणसाठ मिनिटे"

                           "२.५९"- "दोन वाजून एकोणसाठ मिनिटे"
                          -------------------------------------

"२.५९"- "दोन वाजून एकोणसाठ मिनिटे"
------------------------------------

मार्क-रविवारच्या फुटबालसाठी मी बूट घातले
काही लोक श्रीमंत होण्यासाठी जुगार खेळले
मी काहीच नाही गुंतवले, माझे शून्य शून्यच राहिले.

मार्क- मी ऐकलंय, भाड्याची रक्कम तब्येत बिघडवते
ती सारी तुझ्यावरच कर खर्च , माझं मन मला सुचवते
मला बाहेर निघण्याची नोटीस मिळते, बेदखल होण्याची सूचना मिळते
मी आहे एक सामान्य माणूस, मी नाही कोणताही हिरो.

सर्व- अरे वा वा वा वा वा
बेन-मी पैसे वाचविणारा नाही, मी उधळ्या आहे
मी बचत करणारा नाही, मी खूप खर्चिला आहे
मी शनिवार-रविवार मनसोक्त फिरणारा आहे.

सर्व-आपल्या दोन जगांची टक्कर झाली तर आपण काय करूया ?
पॉल-आपल्याला माहित असलेल्या दहा गोष्टींनी आपण आपला जीव वाचवूया
सर्व-खूप कष्ट करून दिवसाकाठी मी घरी जातो
मला हे कळतं नसत, पण मी त्यासाठी तयार असतो
मी खूप पैसे कमावतो, पण माझा खिसा रिक्त असतो
आणि आता २.५९ वाजलेत, माझ्या ट्रेनची मी वाट पाहतो.

ख्रिस-मी अजुनी जीवनाचा अर्थ समजावून घेतोय
माझ्याकडे सूरी नाहीय, पण बटर नेहमीच असतोय
मी रिनोच्या तिकिटासाठी अजूनही खूप त्रास घेतोय.

टी. व्ही. (दूरदर्शन) पाहून मला नेहमीच कंटाळा येतो
मी त्यात इतका का गुंतलोय याचं मी नवल वाटून घेतो
मग वेड्याप्रमाणे तारांतीनो (सिनेमा) ची प्रकर्षाने वाट पाहू लागतो.

बेन- अरे वा वा वा वा वा-ना ना ना ना ना
मी पैसे वाचविणारा नाही, मी उधळ्या आहे
मी बचत करणारा नाही, मी खूप खर्चिला आहे, अरे वा वा वा वा वा
मी एक, शनिवार-रविवार मनसोक्त फिरणारा आहे.

सर्व-आपल्या दोन जगांची टक्कर झाली तर आपण काय करूया ?
पॉल-आपल्याला माहित असलेल्या दहा गोष्टींनी आपण आपला जीव वाचवूया
सर्व-खूप कष्ट करून दिवसाकाठी मी घरी जातो
तुला माहितीय, मला हे कळतं नसत, पण मी त्यासाठी तयार असतो
मी खूप पैसे कमावतो, पण माझा खिसा रिक्त असतो
आणि आता २.५९ वाजलेत, माझ्या ट्रेनची मी वाट पाहतो
पॉल-होय, होय, मी सुद्धा घरी जाण्यास तयार असतो.

सर्व-आपल्या दोन जगांची टक्कर झाली तर आपण काय करूया ?, अरेरे
सर्व-खूप कष्ट करून दिवसाकाठी मी घरी जातो
मला हे कळतं नसत, पण मी त्यासाठी तयार असतो
पॉल- हो माहितीय, हो
सर्व-मी खूप पैसे कमावतो, पण माझा खिसा रिक्त असतो
पॉल-हो तसंच आहे
सर्व-आणि आता २.५९ वाजलेत, माझ्या ट्रेनची मी वाट पाहतो
पॉल-मीही मग माझ्या ट्रेनची वाट पाहतो.

--a1
------
                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
                  ------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================