हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-अखेरीस ख्रिसमस येतोय

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 06:57:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                           --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "After All It's Christmas"-"अखेरीस ख्रिसमस येतोय"

                                 "अखेरीस ख्रिसमस येतोय"
                                ------------------------

"After All It's Christmas"
"अखेरीस ख्रिसमस येतोय"
----------------------------

मला वाटतंय मी ख्रिसमसचा आनंद घेतोय
पण माझ्या हृदयात काही कमीपणा भासतोय
गायक गाण्यातून ऋतू आल्याचं गाऊन सांगतोय
पण याहीवर्षी मी तुला मिस करतोय, चुकवतोय.

ट्रॅफल्गार चौकोन नेहमीच भाग आहे गर्दीचा
पण तू नसताना, तो नेहमीच रिक्त असा असण्याचा
सर्वानाच बर्फ पडण्याची एक उत्कंठा असते
पण माझं मन अजुनी चमत्काराची अपेक्षा करते.

माझा विश्वास आहे, अखेरीस ख्रिसमस येतोय
दिव्यांचा प्रकाश तुला माझ्याकडे येण्याचा रस्ता दाखवतोय
माझा विश्वास आहे, अखेरीस ख्रिसमस येतोय
असं नक्कीच घडतंय
माझा विश्वास आहे, अखेरीस ख्रिसमस येतोय
असं नक्कीच घडतंय
माझा विश्वास आहे, ही ख्रिसमसचीच वेळ आहे.

येणाऱ्या नवं वर्षाची माझी भेट अशीच राहिलीय
प्रकाश भरपूर आहे, पण झाडे उघडीच राहिलीय
मी ती भेट येत्या डिसेम्बरपर्यंत बांधून ठेवीन
आणि त्याच त्या झाडाखाली पुन्हा ठेवून देईन.

मी जणू माझं हृदयच झाडाजवळ ठेवतोय
माझा विश्वास आहे, अखेरीस ख्रिसमस येतोय
दिव्यांचा प्रकाश तुला माझ्याकडे येण्याचा रस्ता दाखवतोय
माझा विश्वास आहे, अखेरीस ख्रिसमस येतोय
असं नक्कीच घडतंय
माझा विश्वास आहे, अखेरीस ख्रिसमस येतोय
असं नक्कीच घडतंय
माझा विश्वास आहे, ही ख्रिसमसचीच वेळ आहे.

आणि सरतेशेवटी ख्रिसमसची सकाळ आली
मी उत्सुकतेने जिन्याखाली धाव घेतली
आणि मला मग धक्काच बसला आश्चर्याचा
पाहून एका मोठया आणि सुंदर भेट वस्तूचा.

तू तुझं हृदयच झाडाखाली ठेवलं होतंस
मला विश्वास होता, की ख्रिसमस आला होता
दिव्यांचा प्रकाश तुला माझ्याकडे घेऊन आला होता
मला विश्वास होता, की ख्रिसमस आला होता
असं नक्कीच घडलं होतं
मला विश्वास होता, की ख्रिसमस आला होता
असं नक्कीच घडलं होतं
शेवटी ख्रिसमस आला होता.

तुला माझं हृदय झाडाखाली मिळालं होतं
मला विश्वास होता, की ख्रिसमस आला होता
दिव्यांचा प्रकाश तुला माझ्याकडे घेऊन आला होता
मला विश्वास होता, की ख्रिसमस आला होता
असं नक्कीच घडलं होतं
मला विश्वास होता, की ख्रिसमस आला होता
असं नक्कीच घडलं होतं
शेवटी ख्रिसमस आला होता, शेवटी ख्रिसमस आला होता.

--a1
------
                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
                     ------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================