मायबोली-लेख क्रमांक-36-डोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नही

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:46:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "मायबोली"
                                   लेख क्रमांक-36
                                  ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"डोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नही"

                       डोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नही--
                      ---------------------------------------

     हे संगीत भारतीय संगीतातील भीमपलास, काफी आणि किरवाणी ह्या रागांच्या प्रचंड जवळ जाणारे आहे. त्याच बरोबर चारुकेशी, जोग, दरबारी आणि काही प्रमाणात खमाज असे देखील राग डोकावतात. ढाफेर हा गातो देखील आणि ते गाणे म्हणजे तिथल्या सहारा वाळवंटातले मंत्रोच्चार आहेत. Desert Chants! त्या आवाजाला अशी काही फिरत आहे की तो अगदी वरच्या पट्टीतल्या सूरापर्यंत सहजरित्या पोहोचतो. त्या क्षणाला त्याचा आणि क्लेरिनेटचा आवाज असा काही बेमालूम मिसळतो की अंगावार शहारा आणि डोळ्यात पाणी हे कधी येते आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. हुस्नू ह्यांचे क्लेरिनेट हे Jazz अंगाने जाते परंतु त्या धून ज्या तो वाजवतो ते बरेच भारतीय संगीताच्या जवळ जाणारे आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला झाकीरभाई ह्यांनी आम्हाला ओळखल्या मुळे आम्ही प्रचंड उत्साहात होतोच. परंतु खऱ्या गप्पा ह्या कार्यक्रमा नंतर झाल्या.

     हुस्नू ह्यांना आम्ही पहिले भेटलो. भारावून गेलेल्या अवस्थेत होतो. त्यांना सांगितले की तुम्ही जे वाजवता ते आमच्या इथल्या संगीताच्या प्रचंड जवळ जाते. त्यांना माहिती होतेच अर्थात! परंतु त्यांनी देखील हेच सांगितले की संगीत हे लोकांबरोबर प्रवास करीत असते तसेच ते आले असणार. परंतु जेव्हा त्यांना हे सांगितले की तुमच्या देशातल्या एका गावाचे नाव आमच्या संगीतातील एका रागाचे नाव देखील आहे तेव्हा मात्र ते आश्चर्यचकित झाले! लगेच मला ई-मेल दिला आणि फेसबुक वरून देखील संपर्कात राहूया असे सांगितले. तसे जर पुढे खरंच झाले तर नक्कीच चंगल्या चर्चा घडतील! पुढे आम्ही भेटलो ढाफेर ह्यांना. त्यांच्या गायकीमुळे माझ्यावर झालेला परिणाम त्यांना सांगितला तेव्हा त्यांनी आनंदाने माझा हात हातात घेतला आणि धन्यवाद दिले! ते औड हे वाद्य वाजवतात. हे वाद्य ट्युनिशिया, अल्जेरिया आणि तुर्कस्थान ह्या देशांमध्ये वाजविले जाते. माझ्या एका अल्जेरियन मित्राने मागच्याच आठवड्यात मला सांगितले होते की हे वाद्य त्यांच्या देशात इस्लाम येण्यापूर्वी भटक्या आदिवासींनी ( nomadic tribes) ह्यांनी आणले. गिटार आणि रबाब ह्या वाद्यांच्या जवळ जाणारे हे वाद्य आहे.

     ह्या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट जाणवली:
वरील धून ह्या ज्या रागांच्या जावळ जाणाऱ्या आहेत ते बहुतांश राग हे काफी ह्या थाटातले आहेत. हेच काय तर अगदी वर सांगितलेले राग ( सुहा, अडाणा) हे देखील. काफी थाट ह्यातले बरेच राग हे ह्या धुनांकडे बोट दाखवतात. ह्याबद्दल नक्कीच संशोधन करायला आवडेल. ह्याबद्दल शेवटी झाकीरभाई ह्यांना विचारले. भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांचा प्रभाव एवढे ते म्हणाले, परंतु असंख्य फोटोच्या विनवण्या येत असल्यामुळे आम्हाला विषय पुढे नेता आला नाही. पण एक गोष्ट मात्र सदैव लक्षात राहील. ढाफेर ह्यांनी जे काही मंत्रोच्चार म्हटले त्याची सुरुवात 'बिस्मिल्ला' ह्या नावाने झाली आणि क्षणात मला त्या लहानपणी ऐकलेल्या अझानची आठवण झाली! ती दहा मिनिटे वाटलं, ह्या जगात पासपोर्ट/व्हिसा हे प्रकार का आहेत? जगातील कोणत्याही व्यक्तीवर एकाच परंपरेचे प्रभाव अथवा संस्कार नाही आहेत. आपण सगळे हे अनेक परंपरांचा गुंता आहोत. नुसरत म्हणतात त्याप्रमाणे,
'फलसफी को बहस क अंदर खुदा मिलता नही,
डोर को सुलझा रहा है और सिरा मिलता नही'

     मशिदीत जोरजोरात अझान लावणाऱ्या इमाम, किंवा ते लावतात म्हणून आपण लावूया असं म्हणून मंदिरात लाउडस्पीकर वर जोरात भजनं लावणारे पंडित, हे सारे हा गुंता सोडवू पाहतात! हे सारे अनुभवताना आणि हे विचार मनात येताना डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि पुढील काही वेळ ते वाहतच राहिले!

--आशय गुणे
(15 February, 2016)
-----------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                      ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================