मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-120-इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता

Started by Atul Kaviraje, March 07, 2023, 10:40:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-120
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता"

                  इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता --
                 ----------------------------------------------

     दिल्लीमधील अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी 'बलात्कार भारतात होत नाहीत इंडियात होतात' दुवा असे वादग्रस्त विधान करुन प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पाश्चात्य विवाहव्यवस्था व भारतीय विवाहव्यवस्था यांबाबत काहीतरी गोलमोल विधाने करुन आणखी गोंधळ उडवून दिला. कोणत्याही स्वरुपाच्या बाईट्ससाठी टपून बसलेल्या प्रसिद्धीमाध्यमांनी लगेचच हा मुद्दा उचलून धरला. रा.स्व.संघाबाबत जनतेच्या मनात असलेला कमालीची अविश्वास आणि संघाच्या फुटीरतावादी धोरणांविषयीची अप्रीती यामुळे सामान्य जनतेचा या गोष्टींवर चटकन विश्वास बसणे साहजिकच होते. मात्र नव्या जमान्यातील यूट्यूब व तत्सम माध्यमांतून भागवत यांचे भाषण जसेच्या तसे ऐकल्यानंतर काही माध्यमप्रतिनिधींना उपरती झाली आणि त्यांनी ट्विटरवर का होईन माफी मागितली. (मात्र भारत-इंडिया या बलात्काराच्या थिअरीच्या विरोधात अनेक पुरावे सादर करुनही भागवत यांनी कुठेच माफी मागितली नाही हे विशेष!) यानंतर पुढचे अतिशय अप्रामाणिक प्रकरण घडले.

    माध्यमांनी माफी मागितल्यावर इंटरनेट हिंदूंनी विविध ठिकाणी हा विषय वाजवायला घेतला. (इंटरनेट हिंदू या शब्दाची थोडक्यात व्याख्याः Internet hindus are defined as anonymous trolls and serial abusers, Hindu nationalists and other right wingers are making a serious play to dominate social media.) मात्र या एकंदर चर्चांचा अविर्भाव माध्यमांचा अप्रामाणिकपणा किंवा विश्वासार्हता हा नसून माध्यमांच्या गटारगंगेद्वारे संघाला शूचिर्भूत करवून घेणे हा होता असे दिसते.

     भारतातील कुठल्याही बऱ्यापैकी समंजस व्यक्तीचा माध्यमांच्या प्रामाणिकपणावरील विश्वास कधीच उडाला आहे.मात्र माध्यमांच्या अप्रामाणिकपणाच्या गाड्याखाली संघाच्या नळाची यात्रा घडवण्याचे काहीच कारण नाही.

     माध्यमे चुकीची ठरली असली तरी त्यामुळे संघ बरोबर ठरत नाही.

     उपक्रम संकेतस्थळावरील सदस्य बऱ्यापैकी पुरोगामी आहेत. त्यामुळे उपक्रमींची निष्पक्ष मते वाचायला आवडतील.

--सदस्य
(January 14, 2013)
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
=========================================