II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-कविता-5

Started by Atul Kaviraje, March 10, 2023, 09:00:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II   
                           ---------------------------------
       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.०३.२०२३-शुक्रवार आहे. आज श्री शिवरायांची जयंती आहे. महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या जगात ज्यांच्या किर्तीचा डंका आजतागायत अजरामर आहे ते शक्तीशाली नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दरम्यान महाराष्ट्रात शिवजयंती करण्याबाबत दोन गट असल्याचे पाहायला मिळते. काही जण शिवजयंती तारखेनुसार साजरी करतात तर काही जण शिवजयंती तिथीनुसार साजरी करतात. लक्षणीय बाब म्हणजे तिथीनुसार दरवर्षी शिवजयंती १० मार्चला साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींनी, शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही कविता.

                शिवाजी महाराज कविता मराठी 2023--

नकोय शिवराय आम्हा नोटेवर
विकला जाईल तो वाटेवर
आहेत समाजात काही दरिंदे
नाहीत ते कुठलेच परिंदे

घेऊन जातील शिवराय
दारूच्या अड्ड्यावर
लावतील त्यालाही सट्ट्यावर
म्हणतील शिवराय घ्या
अन दारू द्या

होतील ते पिऊन तराट
माजवतील कल्लोळ घरात

नाचणारींवर जाईल
पैसा उधळला
नाचता नाचता तोही
जाईल तुडवला

झोपला आहे भ्रष्टाचार
नाही उरलेला शिष्टाचार

भाटाच्या ताटी जाईल थोपवला
गणिकांच्या हाती
जाईल शिवराय सोपवला

खाटीकाच्या दुकानात
जातील घेऊन त्याला
मंदिरात येतील
देवासमोर ठेवून त्याला

नाही विकनाऱ्यांमधला तो
नाही मांडायचा
आम्हाला त्याचा शो

फाटून जाईल
हृदय आमचं
नाही ऐकणार
आम्ही तुमचं

राहू द्या तुमचा
गांधीचा नोटेवर
शिवराय आमचे
शोभतात हृदयाच्या
सिंहासनावर

जय शिवराय! जय महाराष्ट्र!!

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑर्डर.इन)
                        ------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.03.2023-शुक्रवार.
=========================================