II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-सुविचार आणि शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, March 10, 2023, 09:05:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II   
                           ---------------------------------
       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.०३.२०२३-शुक्रवार आहे. आज श्री शिवरायांची जयंती आहे. महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या जगात ज्यांच्या किर्तीचा डंका आजतागायत अजरामर आहे ते शक्तीशाली नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दरम्यान महाराष्ट्रात शिवजयंती करण्याबाबत दोन गट असल्याचे पाहायला मिळते. काही जण शिवजयंती तारखेनुसार साजरी करतात तर काही जण शिवजयंती तिथीनुसार साजरी करतात. लक्षणीय बाब म्हणजे तिथीनुसार दरवर्षी शिवजयंती १० मार्चला साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींनी, शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा.

                छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा--

     शिवाजी महाराजांचे विचारच (Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi) त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा होती. त्यामुळे महाराजांचे हे विचार जाणून घेणे फार महत्वाचे आहेत.

     सोशल मीडियावर शिवाजी महाराजांविषयीचा अभिमान आणि आदर करणारे स्टेटस (Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi) ठेवूनही तुम्ही हा आनंद व्यक्त करु शकता. यासोबतच तुम्ही संभाजी महाराज स्टेटस ही वाचू शकता.

     शिवाजी महाराजांचा जन्म हा मराठ्यांसाठी नवा सुर्योदय घेऊन आला. त्यांच्या या जन्म दिवसाच्या खास शुभेच्छा अर्थात शिवजयंतीच्या शुभेच्छा ( Shivaji Jayanti Wishes In Marathi) आप्तेष्टांना पाठवून हा दिवस साजरा करा.

शिवाजी महाराजांवर काही अशी घोषवाक्ये (Shivaji Maharaj Slogan In Marathi) लिहिण्यात आली आहेत ज्या तुम्हाला प्रेरणा देतील अशाच आहेत.

--ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची

--झाले बहू .. होतील बहू... पण शिवरायांसारखा कोणीच नाही

--सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो... तो म्हणजे छत्रपती

--ना शिवशंकर.... ना कैलासपती... ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी ..

--ज्याने केली स्वराज्य निर्मिती... देव माझा तो राजा छत्रपती

--सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

--वैकुंठ रायगड केला... लोक देवगण बनला... शिवराज विष्णू झाला.. वंदन त्याला...

--शौर्यवान योद्धा... शूरवीर... असा एकच राजा जन्मला .... तो आमुचा शिवबा. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

--निश्चयाचा महामेरु... बहुत जनांसी आधारु...अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती.

--अतुलनीय... अलौकीक... अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती
जय भवानी.. जय शिवाजी!

--छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

--लीनल गावडे
-------------

                        (साभार आणि सौजन्य-मराठी.पॉप xo.कॉम)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.03.2023-शुक्रवार.
=========================================