मायबोली-लेख क्रमांक-40-एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन

Started by Atul Kaviraje, March 10, 2023, 10:45:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "मायबोली"
                                     लेख क्रमांक-40
                                    ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन"

                एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन--
               --------------------------------------------------

     जर सरकारनं मनात आणलं तर या गावाचा कायापलट होऊ शकतो. या ठिकाणाचा समावेश माथेरान, महाबळेश्वर यासारख्या थंड हवेच्या ठिकाणामध्ये समावेश होऊ शकतो. एवढेच नव्हे तर तेथे एक उत्तम प्रकारचे आदिवासी पर्यटन ठिकाण म्हणून धिक महत्व या ठिकाणाला मिळू शकते. आज आदिवासीचे जगल, आदिवासीची संस्कृती आदिवासीच्या जगलातील रानमेवा यांची जर योग्यरित्या जपवणूक केली तर भविष्यात या ठिकाणाला नजिकच निर्माण होणारे मेगासिटीसारखे आंतरराष्ट्रीय उद्योग आणि पनवेल नजीकचे नवीन होणारे विमानतळ तसेच मुंबईृ, नवीमुंबई, ठाणे, पुणे, पनवेल या सारख्या मोठया शहरातून पर्यटकांचा ओढा मोठया प्रमाणात येऊ शकतो. यामुळे या ठिकाणला माथेरान आणि महाबळेश्वरसारख्या ठिकाणासारखा दुसरा पर्याय जगासमोर उभा राहील. शिवाय तेथील आदिवासी लोकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊल हे नक्की.   

     तसेच प्रबळगड हा माथेरान म्हणून निवड होऊन देखील पाण्याअभावी माथेरान येथे विकसित झाले नाही. त्यासाठी सध्या पाणी म्हणून पर्याय प्रबळगडाच्या मागच्या बाजूला मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे धरण हा पर्याय देखील सध्या उपलब्ध झाला आहे. जर विकासाच्या नजरेने पाहिले तर हया ठिकाणाचा विकास करणे अधिकच सोपे झाले आहे. पण त्यासाठी लागणारी मानसिकता सरकारकडे नाही. प्रत्येक निवडणूकीत स्थानिक नेत्याकडून निवडणूकीच्या तोडावर आश्वासनांची खैरात वाटली जाते. पण येथे अजुनही एका रस्त्याअभावी एक आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन ठिकाण म्हणून विकासासाठी नजर लावून बसलेले दिसते. 2006 च्या हिवाळी अधिवेशनात या गावाच्या रस्त्याचा मार्ग सुकर झाला होता. परंतु सदर निधी बांधकाम विभागाकडे सोपवला होता. याचा तपशलि माहिती अधिकारात विचारली असता सदर निधीतून ठाकूरवाडी ते माची प्रबळ दरम्यान रस्ता तयार केला आहे. अशी माहिती मिळाली. परंतु प्रत्येक्षात पाहिले तर ते फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आहे. प्रत्यक्षात तेथे रस्ताच नाही. यामुळे यामध्ये नेमक काय तथ्य आहे. हे गावातील सर्वसामान्य आदिवासी लोकांना कळत नाही. काही ठिकाणी डोंगर फोडून रस्ता बनवायला लागेल त्यामुळे या गावाची कहाणी प्रतिनिधीक आहे. त्या आदिवासीच्या दुदैवी दशावताराला सरकारची उदासिनता जबाबदार आहे. एका रस्त्याने अडलेले आदिवासी गाव व विकासाच्या प्रत्यक्षात असलेले नविन आदिवासी पर्यटन ठिकाण एका रस्त्याने अडवलेल्या या गावाचा जगायचा मार्ग सरकार सुकर करणार का? हाच प्रश्न तेथील आदिवासीकडून विचारला जातोय.

--निलेश (भाऊ) भुतांबरा
संस्थापक
(प्रबळगड संवर्धन आदिवासी सामाजिक विकास संस्था)
-----------------------------------------------

--निलेश भाऊ
(13 February, 2014)
-----------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.03.2023-शुक्रवार.
=========================================