हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-तुला आठवतंय का ?

Started by Atul Kaviraje, March 12, 2023, 06:28:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                            --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे-"Do You Remember?"-"तुला आठवतंय का ?"

                                   "तुला आठवतंय का ?"
                                  ---------------------

"Do You Remember?"
"तुला आठवतंय का ?"
------------------------

पुन्हा पाठी वळून नकोस तू पाहू
आठवणी अश्या का जातील प्रवाहात वाहून
मला आपलं ते प्रेम आठवतं
काही केल्या ते नाही विसरता येतं
इतकं सुंदर ते कधीच नव्हतं
ते प्रेम फक्त आपलंच होतं
आता भूतकाळात डोकावून काहीच फायदा नाही
आपल्या दोघांनाही माहितीय, ते टिकणारच नाही.

ती एक मजा होती, तो एक धमाका होता
मला आठवतंय तो सुंदरतेचा परिपाक होता
आता ते कुठं गेलंय, अफसोस.

तुला तो डिसेम्बरचा पहिला दिवस आठवतोय ?
आपण तेव्हा मागच्या सीटवर बसलो होतो
रेडिओवर आपले आवडते गाणे ऐकत होतो
आणि ऐकता ऐकताच काही कारणाने भांडतही होतो
माझी बेबी दुःखी होती, आणि मी तेव्हा वेडाच होतो
पण ते सारं उकरून काही फायदा नाही
तुला ते गाणं अजुनी आठवतंय का ?

आपण नेहमीच नियम मोडत आलो होतो
नको त्याच गोष्टी आपण करत होतो
आपण खूपच वाईट करत होतो
पण ते आपण चांगलंच समजतं होतो
तुला ते नक्की आठवतंय का
मला वाटतंय तुला ते नीट आठवतंय
विचार करतोय तू आज रात्री कुठे असशील
पण मी ठाम आहे, तू ठीकच असशील
कारणं आपला नशीब मी चमकताना पाहतोय
ते इतकं उत्तम आहे की ते घडताना बघतोय
कुठे आहेस तू, कुठे गेली आहेस तू ?

आता ये, आणि हे गाणे मोठ्या उत्साहाने गा !

तुला तो डिसेम्बरचा पहिला दिवस आठवतोय ?
आपण तेव्हा मागच्या सीटवर बसलो होतो
रेडिओवर आपले आवडते गाणे ऐकत होतो
आणि ऐकता ऐकताच काही कारणाने भांडतही होतो
माझी बेबी दुःखी होती, आणि मी तेव्हा वेडाच होतो
पण ते सारं उकरून काही फायदा नाही
तुला ते गाणं अजुनी आठवतंय का ?

पुन्हा पाठी वळून नकोस तू पाहू
आठवणी अश्या का जातील प्रवाहात वाहून
मला आपलं ते प्रेम आठवतं
काही केल्या ते नाही विसरता येतं
इतकं सुंदर ते कधीच नव्हतं
ते प्रेम फक्त आपलंच होतं
कुठे गेलं ते प्रेम ?

आता ये, आणि हे गाणे मोठ्या उत्साहाने गा !

तुला तो डिसेम्बरचा पहिला दिवस आठवतोय ?
आपण तेव्हा मागच्या सीटवर बसलो होतो
रेडिओवर आपले आवडते गाणे ऐकत होतो
आणि ऐकता ऐकताच काही कारणाने भांडतही होतो
माझी बेबी दुःखी होती, आणि मी तेव्हा वेडाच होतो
पण ते सारं उकरून काही फायदा नाही
तुला ते गाणं अजुनी आठवतंय का ?

--a1
------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
                    ------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.03.2023-रविवार.
=========================================