मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-147-ऑनलाइन शिक्षण: निबंध मराठी फायदे व तोटे

Started by Atul Kaviraje, March 12, 2023, 10:31:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-147
                                 ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "ऑनलाइन शिक्षण: निबंध मराठी फायदे व तोटे"

     आपल्या देशात एक काळ होता जेव्हा पालक आपल्या मुलांना शिक्षण आणि चांगले संस्कार देण्यासाठी गुरुकुल मध्ये पाठवत असत. लहानपणापासून तर 24 वर्षाच्या वयापर्यंत विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असे. त्याला पुस्तकी अभ्यासासोबात अध्यात्मिक संस्कार आणि शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जायचे. शिक्षणाच्या या प्रक्रियेला गुरुकुल पद्धती म्हटले जायचे.

     नंतरच्या काळात आधुनिक प्रगती झाली. शिक्षणाच्या पद्धती बदलून इंग्रजी शाळा व महाविद्यालये देशात आली. आज देशातील सर्वच विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत आहेत आणि गुरुकुल पद्धती पूर्णपणे नाहीशी झाली आहे.

     परंतु मागील पाच वर्षात झालेल्या इंटरनेट क्रांतीमुळे देशात डिजिटल शिक्षणाची सुरुवात झाली आहे. विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन शिक्षण प्राप्त करीत आहेत. यातच भर म्हणजे मागील वर्षी आलेली जागतिक महामारी covid 19 होय. या एक वर्षात देशातील ऑनलाईन शिक्षण मोठ्या प्रमाणात वाढले. आज आपण ऑनलाइन शिक्षण या विषयावर मराठी निबंध मिळवणार आहोत. तर चला सुरू करुया...

     आज शिक्षण हे आपल्या जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तायुक्त शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. कारण चांगला शिक्षणाच्या बळावरच योग्य करिअर निवडले जाऊ शकते. कोणत्याही देशाला विकसित करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व भरपूर आहे.

     आपल्या देशात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. परंतु देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले. देशातील परंपरागत शिक्षणाने आधुनिक रूप घेतले. वर्तमान काळात ई एज्युकेशन अर्थात ऑनलाइन शिक्षण भारतासह जगभरात लोकप्रिय झाले आहे. ऑनलाइन शिक्षण एक अशी शिक्षण प्रणाली आहे ज्यात शिक्षक इंटरनेट चा वापर करून देशातील किंवा जगभरातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात.

               ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय ?--

     आज जगभरात पसरलेली महामारी कोविड 19 मुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन आणि कर्फ्यू मुळे घरातून बाहेर निघून शिक्षण प्राप्त करणे कठीण झाले आहे. अशा काळात देशातील विविध शाळांमधील शिक्षकांनी ऑनलाइन माध्यमाने विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. स्काईप, व्हाट्सअप, झूम व्हिडीओ इत्यादी काही प्रसिद्ध मोबाईल ॲप आहेत ज्यांच्या मदतीने ऑनलाइन शिक्षण दिले जाते. यात विद्यार्थी आपापल्या घरी बेडरूम किंवा स्टडी टेबल वर बसून लॅपटॉप अथवा मोबाईल च्या सहाय्याने शिक्षण मिळवू शकतात.

     ऑनलाइन शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विद्यार्थी जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात घरबसल्या शिक्षण प्राप्त करू शकतो, परंतु आजही आपल्या देशात अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेट नाही तर हा ऑनलाइन शिक्षणाचा तोटा आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.03.2023-रविवार.
=========================================