मायबोली-लेख क्रमांक-42-अर्धा-दशक लहान बायको - भाग २

Started by Atul Kaviraje, March 12, 2023, 10:43:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "मायबोली"
                                    लेख क्रमांक-42
                                   ---------------
                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मायबोली", या शीर्षकI-अंतर्गत, एक सामाजिक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"अर्धा-दशक लहान बायको - भाग २"

                          अर्धा-दशक लहान बायको - भाग २--
                         -------------------------------

     पण एवढं असून सुद्धा ही दरी मी भरून काढायचा प्रयत्न करू शकत होतो. परंतु ती दहावीतच असताना फेसबुक तिच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्याच्या जवळ जवळ चार एक वर्ष तरी आधी इंटरनेट! त्यामुळे ही दरी भरून काढणं मला नक्कीच जड जात होतं. आणि ते वापरण्यात मी नक्कीच कमी पडत होतो. म्हणजे फेसबुक आणि एकूण सोशल मिडिया हे तुमच्या आवडी जोपासणाऱ्या, सम-विचारी लोकांना शोधणारे आणि त्या नंतर त्यांना प्रत्यक्ष भेटून मैत्री करायसाठी उत्तम माध्यम आहे एवढेच मला माहिती होते! परंतु त्याच्या पलीकडे देखील त्याचे भरपूर उपयोग आहेत हे मला काही दिवसात समजले. निमित्त होते एका रविवारी - लग्नाला दोन महिने झाले म्हणून (!) - दिवसभर फिरायला जाण्याचे. तिला एव्हाना नोकरी देखील लागली होती. परंतु ती जिथे जायची तिथे मेट्रो ने जावे लागत नव्हते. आणि ही पुण्याची असल्यामुळे तिला मेट्रो मध्ये बसायचे आकर्षण होते. पण आमचा अख्खा दिवस साऱ्या जगाने पाहवा अशी तिची योजना होती! त्यामुळे मेट्रो मध्ये बसायच्या आधी घाटकोपर स्टेशनवर 'excited to ride mumbai metro for first time' असा स्टेटस फेसबुक वर लिहिला गेला आणि 'with' मध्ये माझे नाव! त्या नंतर दोन मिनिटे नाही झाली की 'and the ride begins' म्हणून पुन्हा फेसबुक स्टेटस.... सोबत मी होतोच! पाच मिनिटांनी मी तिला खाली दिसणारी रहदारी दाखवणार तेवढ्यात एका सेल्फीची फर्माईश! मग पुढे 'mumbai metro selfie' अशा नावाने पुन्हा आम्ही फेसबुकवर! एव्हाना अंधेरी स्टेशन आले आणि उतरायची वेळ झाली. मुंबई मेट्रोच्या ब्रिज वरून दिसणारी मुंबई बघायचीच राहिली.... पण हे सगळं संपलं नव्हतं! त्यानंतर जेवताना प्रत्येक डिशचा काढलेला फोटो आणि प्रत्येक वेळेस त्याचा फेसबुकवर मांडलेला पंचनामा हे काही संपत नव्हतं. दिवसाचा शेवटचा टप्पा हा पिक्चर बघण्याचा होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पिक्चर बघताना देखील साधारण दर १५ ते २० मिनिटांनी मोबाईल बाहेर काढला जात होता. थेटरात बसलेले बहुतांश तिच्या वयाचे लोक मला हेच करताना आढळत होते. आणि मला अपेक्षित होते तेच झाले. घरी परत येताना पिक्चर बद्दल काही बोलताच आले नाही. कारण बहुतांश गोष्टी तिच्या नीट लक्षातच नव्हत्या!
बाकी इंटरनेट आणि मोबाईल हे आता अविभाज्य घटक वगेरे राहिले नव्हते. तर ते एक शारिरिक विस्तार झाले होते! त्यामुळे काही मजेशीर गोष्टी देखील होयच्या. माझा एक चुलत भाऊ अमेरिकेत असतो. तिथे कुठे फिरायला गेला तर तिथले फोटो आमच्याशी शेअर करतो. त्यातलाच एक फोटो पाहताना हिने प्रतिक्रिया दिली होती
" अरे... ही झाडं बघ ना ... Farmville सारखी आहेत!"

     तशीच एक प्रतिक्रिया तिने चर्चगेटच्या रस्त्यांवरून जाताना एका sweet-shop कडे पाहून दिली होती. तिथल्या डब्यांमध्ये विविध प्रकारच्या गोळ्या ठेवलेल्या पाहून तिची प्रतिक्रिया होती की त्या candy crush saga ह्या खेळासारख्या होत्या. दोन्ही वेळेस मला हेच सांगावे लागले की ह्या दोन खेळांची संकल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या गोष्टींपासून निर्माण झाली आहे. असाच एक प्रसंग फेसबुक नवीन आले तेव्हा मी अनुभवला होता. तेव्हा मी कॉलेजला होतो. फेसबुकची संकल्पना मूळ अमेरिकन. तिथल्या जीवनपद्धती मुळे निर्माण झालेल्या सर्व गोष्टी ह्या माध्यमातून आपल्याला दिसतात. त्यात एक 'poke' असा पर्याय आहे. ह्याचा अर्थ बोटाने हलकेच टोचणे. म्हणजे तिथे कामानिमित्त एकमेकांपासून लांब गेलेली माणसं फेसबुक वर प्रतिसाद द्यायची थांबली तर आपण त्यांच्या प्रोफाईल वर जाउन हे poke चे बटण क्लिक करायचे. पण हीच गोष्ट आमच्या बिल्डींग मधल्या दहावीतल्या दोन पोरांनी ( एक पहिल्या आणि दुसरा दुसऱ्या मजल्यावर राहणारा) सुरु केली तेव्हा मला हसावं का रडावं हेच कळेना! शिवाय ते एकमेकांना बाहेर सागायचे देखील,

--आशय गुणे
(2 October, 2015)
--------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मायबोली.कॉम)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.03.2023-रविवार.
=========================================