मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-148-ऑनलाइन शिक्षण: निबंध मराठी फायदे व तोटे

Started by Atul Kaviraje, March 13, 2023, 10:32:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-148
                                 ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "ऑनलाइन शिक्षण: निबंध मराठी फायदे व तोटे"

                   ऑनलाइन शिक्षणाचे फायदे--

     ऑनलाइन शिक्षणाला आधुनिक शिक्षणाचे नवीन स्वरूप म्हटले जाऊ शकते. ज्यात विद्यार्थ्यांना लांब प्रवास करून शाळेत फळ्यासमोर बसण्याऐवजी घरबसल्या लॅपटॉप वरूनच शिक्षकांशी संपर्क करता येतो. या शिक्षणासाठी आवश्यकता एवढीच आहे की विद्यार्थ्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन आणि मोबाईल / कॉम्प्युटर अथवा लॅपटॉप असायला हवे. 

     आज शाळा, कॉलेज तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी कोचिंग साठी घराबाहेर न जाता, घरीच राहून निश्चिंतपणे शिक्षण घेत आहेत. या शिक्षणामुळे दूर शाळा असणाऱ्या विद्यार्थ्याला लागणारा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचतो. विदेशात शिक्षणाची ईच्छा असूनही आर्थिक परिस्थिती ठीक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा फायदा झाला आहे. ऑनलाईन शिक्षणात आपण आपल्या वेळेनुसार योग्य वेळ निवडून लेक्चर करू शकतो.

                   ऑनलाइन शिक्षणाचे तोटे--

     ऑनलाईन शिक्षणात वेळ आणि पैसा दोघींची बचत होते. परंतु असे म्हटले जाते की कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. ऑनलाइन शिक्षणाचे देखील तसेच आहे. जसे एकीकडे याचे फायदे आहेत त्याच पद्धतीने अनेक नुकसान व दुष्परिणाम देखील आहेत. आपल्या देशात अजूनही अनेक खेड्या गावात इंटरनेट उपलब्ध नाही आहे व ज्या लहान शहरांमध्ये इंटरनेट आहे तेथे त्याची गुणवत्ता फार चांगली नाही आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी योग्य नेटवर्क ची आवश्यकता असते. ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने व्हिडिओ थांबणे, आवज ऐकू न येणे किंवा व्हिडिओ अडकणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

     ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची कमतरता निर्माण होते. आधी शाळेत गेल्यावर शिक्षेचे भयाने विद्यार्थी लक्ष देऊन शिक्षकांचे शिकवणे ऐकत असे. परंतु ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी काय करत आहे हे शिक्षकांना दिसत नाही. ज्यामुळे विद्यार्थी बेशिस्त होतात आणि कित्येकदा ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेत नाहीत.

     व्यवहारीक अनुभव आणि प्रात्यक्षिके ही शिक्षणाच्या दृष्टिने खूप महत्त्वाची आहेत. ऑनलाईन शिक्षणात जास्तकरून प्रात्यक्षिकांचा आभाव दिसून येतो. या शिक्षणात ॲनिमेटेड व्हिडिओ चा उपयोग केला जातो. शाळेत विद्यार्थी भौतिक वस्तूंचे निरीक्षण करून अभ्यास करतात. हा प्रात्यक्षिक स्पर्श त्यांना अभ्यासाविषयी आवड निर्माण करतो. परंतु ऑनलाईन शिक्षणात याची कमी असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होत नाही. या शिवाय तासन्तास मोबाईल अथवा लॅपटॉप स्क्रीन समोर बसून विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास निर्माण व्ह्यायला लागतात. डोके दुखी, डोळ्यात आग होणे व थकवा येणे यासारख्या शारीरिक समस्या तर चिडचिडेपणा या सारख्या मानसिक समस्या निर्माण होतात.

                 ऑनलाइन शिक्षण योग्य की अयोग्य--

     ऑनलाइन शिक्षणाचे अनेक फायदे आहेत परंतु त्या सोबत दुष्परिणाम देखील आहेत. परंतु असे म्हणणे देखील चुकीचे नाही की लॉक डाऊन च्या काळात याच पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मदत झाली. आज ऑनलाईन शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या शिवाय दूर राहणाऱ्या तसेच वयस्क विद्यार्थी जे स्वशिस्त आहेत त्यांच्यासाठी ही शिक्षण पद्धत योग्य आहे. परंतु बाल व किशोरवयीन मुलांसाठी पारंपारिक पद्धतीने शाळेत जाऊन शिक्षण घेणे जास्त योग्य आहे. शिक्षणाच्या या दोन्ही पद्धती वापरून विद्यार्थी आपल्या ज्ञानात वृध्दी करून आयुष्यात यश मिळवू शकतो.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.03.2023-सोमवार.
=========================================