मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-126-इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ४

Started by Atul Kaviraje, March 13, 2023, 10:37:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                   लेख क्रमांक-126
                              ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ४"

                        इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ४--
                       ---------------------------------

     भाग ३ मध्ये खालील प्रतिसाद दिला होता. तोच इथे लेख म्हणून प्रसिद्ध करत आहे.
मी इकडे आलो तेंव्हा मुलगा २.५ वर्षांचा होता. ग्रंथालयात खूप पुस्तके मिळतात. दर मुलामागे १०-१५ पुस्तके एकाचवेळी ३ आठवड्यांसाठी मिळतात. शिवाय ग्रंथालय फुकटच असते. सगळी पुस्तके लहान मुलांच्या लेव्हलची वाटली. खूप खूप चित्र आणि काही काही पुस्तके तर आपल्या पंचतंत्र, चायनीज आणि जापनीज व अरेबियन पुस्तकांची भाषांतरे. त्यात वरती त्या त्या भाषेतल्या ओळी म्हणजे हिंदी/पंजाबी आणि बंगाली वगैरे आणि खाली इंग्रजी भाषांतर. त्याच्या जोडीला योग्य चित्र. म्हणजे भाषा कळली नाही तरी चित्रांवरून त्या गोष्टीचे आकलन होते. शिवाय सगळ्या गोष्टींमधून अजिबात नैतिकतेच आणि चांगल्या वागणुकीचा डोस मिळत नाही. मुले जशी वागतात तश्याच गोष्ठी आणि हेच मुलाने खूप एन्जोय केले असे म्हणीन मी. दुसरा प्रकार म्हणजे इथे अनेक टोडलर ग्रूप्स असतात. बहुदा २-४ वर्षांच्या मुलांना टोडलर म्हणतात. खूप ठिकाणी ह्या वयोगटासाठी चर्च, कौन्सिल आणि काही सामाजिक संस्था किंवा प्रायव्हेट संस्था पण त्यांना सरकार मदत करते १ ते २ तासांचे शिबीर ठेवतात. हे रोज नसते पण रोज कुठे ना कुठेतरी मिळतेच. आपल्याकडे जशी फुटाफुटावर देवळे आहेत तशी इथे चर्चेस दिसली आणि जवळपास प्रय्तेक चर्चची शाळा तरी आहे किंवा त्यांच्या प्रार्थना हौल शेजारीच एक छोटीसी खोली किंवा कधी कधी बरीच मोठी खोली असते. तिथे हे वर्ग भारतात. मला तर हा एक प्रकारचा संस्कार वर्गाच वाटला. म्हणजे कोणी उपदेश देत नाही. पण सगळी इंग्रजी गाणी आणि त्यावर शारीरिक हालचाली. ह्या हालचालीच मुलांना आवडतात. खेळायला पण बरीच खेळणी असतात. माझ्या मुलाला स्कूटर खेळायला इथे मिळाली मग नंतर भरपूर माती आणि पाणी. सगळी चंगळच. कारण घरात हे असले करायला मिळत नाही. मग तो वाट बघत बसायचा. रेडिंगला बरेच असे टोडलर फुकटात होते पण लंडन मध्ये दर दिवसाला १-२ पौंड द्यावे लागायचे. अर्थात हे परवडले कारण घरात एकटेच बसून जाम त्रास देतात पोरे. किती आई वडिलांचे तेच तेच तोंड बघणार. मुलांना शेवटी मुलेच लागतात खेळायला.

     इथे सगळ्या मुलांना ३ वर्षांनतर दर आठवडयाला १५ तास विनाखर्च शिक्षणाचा नियम आहे. म्हणजे हे शिक्षण तुम्ही कौन्सिलच्या शाळेत म्हणजे थोडक्यात महानगरपालिकीच्या शाळेत घ्या अथवा कुठेही घ्या. म्हणजे काही पालक दिवसभर मुलांना नर्सरीमध्ये ठेवतात. तर दर आठवडयाला ह्या नर्सरी सरकारकडे त्या १५ तासांचे पैसे फॉर्म्स भरून मिळवतात म्हणजे थोडक्यात ग्रांट मिळवतात. जर का नर्सरी करत नसेल तर तुम्ही भरलेल्या करातून तुम्हाला सुट मिळते. तुमच्या ऑफिसमध्ये तसे सांगायचे म्हणजे पगारातूनच कर कापला जाताना कमी कापला जातो. घरापासून सगळ्यात जवळच्याच शाळेत तुम्हाला अडमिशन मिळते. म्हणजे आह्मी खूप ठिकाणी फॉर्म्स भरले पण जवळ्याच शाळेत तुम्हाला अडमिशन मिळते.

     सर्व शाळांचे ईन्स्पेक्षन होवून त्याच्या माहिती http://www.ofsted.gov.uk/ ह्या वेबसाईटवर मिळते. सर्व शाळांचे मुल्यांकन करून अ दर्जा, ब दर्जा असे दिलेले असते. अ दर्जावाली अर्थातच चांगली. ह्या शाळात अडमिशन मिळवण्यासाठी बरेच लोक स्वतःचे राहते घर सोडून शाळेच्या जवळ भाड्याच्या घरात राहायला जाताना पहिले आहे. ह्याशिवाय अनेक लोक, मुख्यत्वे भारतीय, खोटी माहिती देवून अडमिशन मिळवतात. अर्थात पकडले गेलेल्या पण अनेक केसेस पहिल्या आहेत आणि १-२ लोकांना पोलीस कोठडीपण मिळाल्याची बातमी वाचली आहे. जरा अवांतर झाले. असो.

--पुणेकर
(January 7, 2013)
--------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.03.2023-सोमवार.
=========================================