मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-127-इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ४

Started by Atul Kaviraje, March 14, 2023, 10:48:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                   लेख क्रमांक-127
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ४"

                       इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ४--
                      --------------------------------

     पण मुख्य मुद्दा सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे. साधारणपणे ४ वर्षांची मुले झाली की त्यांना रिसेप्शन मध्ये म्हणजे बहुतेक आपल्याकडे सिनियर के.जी. मध्ये अडमिशन मिळते. त्यासाठी कौन्सिलच्या वेबसाईटवरच ऑनलाइन अर्ज भरायचा. त्यात आपल्याला पाहिजेल त्या शाळांचा क्रम द्यायचा. बहुदा ६-७ शाळांचा अग्रक्रम देता येतो. अडमिशनचे नियम पण तिथेच बघायला मिळतात. मुख्य म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे घराजवळची शाळा, म्हणजे मुलांनी शाळेत चालत आले पाहिजेल आणि त्यांचा व्यायाम घडवा हा उद्धेश, मग कोणाचा भाऊ/बहिण असेल तर त्याला प्राधान्य. जर का चर्चची शाळा असेल तर त्यांच्या संमंधीत मुलांना आधी अडमिशन मिळते. आपल्या घरी पत्र येते कुठे मिळाली जागा मिळाली ह्याचे. ह्याशिवाय जर का एखाद्या शाळेत जागा खाली झाली तर शाळा आपल्याला पत्र लिहून कळवते की जागा खाली आहे तुम्हाला अडमिशन घ्यायची असेल तर भेटा. आह्मी मुलाची शाळा बदलली कारण आधी मिळालेली जरा लांब होती. म्हणजे चालत जायला २५ मिनिटे लागायची आणि मग दुसरे अपत्य झाल्यावर बायकोला झेपेना. मग जवळच्या शाळेतून बोलावणे आल्यावर तिकडे जावून शाळा बघून आलो. शाळेत गेल्यावर मुलाला तिथल्या शिक्षांनी छान सामावून घेतले. म्हणजे पहिल्याच भेटीत त्याने सांगितले की मला इथे यायचे. हे सगळे आमचे बोलणे मराठीतूनच चालले होते. कोणीही काहीही म्हटले नाही. उलट शाळेतून सांगितले की तुम्ही तुमच्या भाषेत बोला. आह्मी त्याचे इंग्रजी करून घेऊ. मला आधी हे लै भारी वाटले पण नंतर विचार करता असे वाटले की नाहीतरी इथे सगळीकडे इंग्रजीच बोलावे लागते मग त्यांनी असे सांगितल्याने फार काही हुरळून जाण्यात अर्थ नाही. कारण तिथे स्थाईक झालेल्या काही भारतीय कुटुंबांकडे जाणे येणे झाले तेंव्हा लक्षात आले की त्यांची मुले ही पूर्णपणे ब्रिटीश आहेत. पण तरीही लोकांनी आपली भाषा बोलावी हा त्यांचा दृष्टीकोण घेण्यासारखा आहे.

     साधारणपणे ४ वर्षांपासून शाळा एकदम सकाळी ९ ते ३.३० पर्यंत होवून जाते. प्रत्येक वर्गात फार तर ३० मुलेच पाहायला मिळाली आणि प्रत्येक वर्गावर एक मुख्य शिक्षिका आणि तिच्या मदतीला ५ शिक्षक. पण हे दिवसभर असतात. म्हणजे आपल्याकडे एका वेळी एकाच शिक्षक तासावर असतो. पण ३-५ शिक्षक तासावर पहिले. मग दर ५ मुलांमागे एक शिक्षक असे गणित आहे. कधी कधी जेंव्हा शिक्षक कमी असतात तेंव्हा पालकांना मदतनीस म्हणून बोलावतात. माझ्या मुलाला सुरवातीला पूर्ण इंग्रजी मध्याचा फारच त्रास झाला. कारण हैदराबादला तसा तो घरातच होता. त्यामुळे एकदम शाळेत घातल्यावर तो फारच भांबावून गेला. मग कधीतरी म्हणाला की शाळेत त्याला बाकीचे त्रास देतात आणि टीचर लक्ष देत नाही. मग बायको मदतनीस म्हणून गेली काही दिवस. जसे त्याला थोडे थोडे बोलता आले किंवा टीचरला सांगता यायला लागले तसे जाणे बंद केले. पण मुख्य प्रश्न मुलांनाच की टीचरला न सागता येणे हा असतो. गोरी पोरे जरा जात्याच दांडगट वाटली. म्हणजे अंगापिंडाने मजबूतच आहे शिवाय काही मुले पार लहान वयातच आय माय ह्यांचा छान उद्धार करतात. मग शाळेतून पालकांना नोटीस जाते आणि कधी कधी फार झाले तर चक्क काढून टाकलेले पण पहिले.

--पुणेकर
(January 7, 2013)
--------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.03.2023-मंगळवार.
=========================================