हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-एक शेवटचे गाणे

Started by Atul Kaviraje, March 17, 2023, 11:18:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                             -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे-"One Last Song"-"एक शेवटचे गाणे"

                                   "एक शेवटचे गाणे"
                                  -----------------

"One Last Song"
"एक शेवटचे गाणे"
-------------------

माझा हात हाती घे, माझ्या चेहऱ्याला स्पर्श दे
मला तुझ्या मिठीत घे, मला आलिंगन दे
मला तुझ्या डोळ्यांत पाहू दे
तू माझा निरोप नाहीस घेणार हे, मला कळू दे.

कसं वाटतंय ते मला सांग आता
आणि कसलाही विचार नको करुस तू आता.

आणि तुला माझी गरज पडेल, तेव्हा मला किस कर
नंतर सांग तुला ते कस वाटलं
आणि मी तुला हवा असेन, तर तसं मला दाखव
तुझ्या मनात खरंखुरं प्रेम दाटलं.

आणि जर माझ्यावर प्रेम करत असलीस
तर मला तुझ्या बाहुपाशात घट्ट जखडून ठेव
जेव्हा मला खूपच मजबूत वाटले
तेव्हा मी तुझ्यासाठी एक गाणे गाईन शेवटले.

मला विचारू दे, वेळ निघून गेलाय का ?
तुला वाटतंय, हा फार काळ टिकेल का ?
तसं नसेल, तर मग थांबायचंच का ?
तुझ्या पंखांनी तू मग उडून जा !

मी तुझ्यावर असं प्रेम करतोय
मी फक्त एकटाच असतोय
जो तुला खाली घेऊन येतोय.

आणि तुला माझी गरज पडेल, तेव्हा मला किस कर
नंतर सांग तुला ते कस वाटलं
आणि मी तुला हवा असेन, तर तसं मला दाखव
तुझ्या मनात खरंखुरं प्रेम दाटलं.

आणि जर माझ्यावर प्रेम करत असलीस
तर मला तुझ्या बाहुपाशात घट्ट जखडून ठेव
जेव्हा मला खूपच मजबूत वाटले
तेव्हा मी तुझ्यासाठी एक गाणे गाईन शेवटले.

एक शेवटले गाणे मी तुझ्यासाठी गाईन
जे मी नेहमीच गात आलोय
मात्र यावेळी ते खरंच असेल
मी तुझ्याकडे पुन्हा असा कधीच नाही येणार
तुझ्याकडला माझा किस मी परत मागणार
ओह, नाही नाही नाही नाही.

आणि तुला माझी गरज पडेल, तेव्हा मला किस कर
नंतर सांग तुला ते कस वाटलं
आणि मी तुला हवा असेन, तर तसं मला दाखव
तुझ्या मनात खरंखुरं प्रेम दाटलं.

आणि जर माझ्यावर प्रेम करत असलीस
तर मला तुझ्या बाहुपाशात घट्ट जखडून ठेव
जेव्हा मला खूपच मजबूत वाटले
तेव्हा मी तुझ्यासाठी एक गाणे गाईन शेवटले.

ओह, होय
मी तुझ्यासाठी शेवटचे गाणे गातोय
मी तुझ्यासाठी अखेरचे गाणे गातोय.

--a1
------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-सॉंग लैरिकस.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.03.2023-शुक्रवार.
=========================================