प्रेमातल्या वचनांवर कविता-केलेले वादे आपण निभावूया, एकमेकांचे हमसफर आपण होऊया !

Started by Atul Kaviraje, March 19, 2023, 01:03:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रेमातली वचने निभावण्यावर कविता-गीत ऐकवितो. "जो वादा किया वो निभाना पड़ेगा,रोके ज़माना चाहे रोके खुदाई तुमको आना पड़ेगा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही रविवार-दुपार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (जो वादा किया वो निभाना पड़ेगा,रोके ज़माना चाहे रोके खुदाई तुमको आना पड़ेगा)
----------------------------------------------------------------------

             "केलेले वादे आपण निभावूया, एकमेकांचे हमसफर🚻आपण होऊया !"
             -----------------------------------------------------------

केलेले वादे आपण निभावूया,
एकमेकांचे हमसफर आपण होऊया ! 🚻
हे वादे तोडण्यासाठी नसतात,
आयुष्यभर आपण ते परोपरीने जपूया !

केलेले वादे आपण निभावूया,
एकमेकांचे हमसफर आपण होऊया ! 🚻
या वायद्यातून विश्वासच जपला जातोय,
आपण एकमेकांचा विश्वास संपादन करूया !

केलेले वादे आपण निभावूया,
लोक काहीही म्हणोत, कितीही संकटे येवोत
ईश्वरीय प्रकोप होवोत, कितीही आपदा पडोत,
तुला यावंच लागेल, तुला परतावच लागेल.

माझी नजर तुझ्या दर्शनास तरसत आहे 👁
तुझ्या वाटेकडे माझे मन लागले आहे
केव्हा एकदा येशील, मला भेटशील,
तुला भेटण्यास माझे मन उत्सुक आहे.

हा माझा एकला प्रेम-मार्ग आहे 🏞
या वाटेवरून मी तुला आवाज देत आहे
माझे प्रेम ओळख, तू मला पारख,
सारं सारं काही सोडून तुला परत यायचं आहे.

कदाचित माझं इथलं कार्य संपलेलं असेल
कदाचित मी इथे नसेन, माझ अस्तीत्व नसेल
पण तुझ्या एका पुकाऱ्याला मला ओ द्यावी लागेल,
तू बोलावल्यावर मला यावंच लागेल.

आपल्या वफावर तू बिलकुल अविश्वास दाखवू नकोस
आपल्या निष्ठेवर तू कोणताही आरोप करू नकोस
प्रेम हे विश्वासावरच टिकून असतं,
अविश्वासाचा येथे प्रश्नच नाही उरतं.

तुला मी माझं हृदयच दिलंय 💝
तुझ्यावर मी माझं जीवन ओवाळून टाकलंय
प्रसंगी मी माझा जीवही तुझ्यासाठी देईन,
प्रसंगी मी माझा प्राणही तुझ्यासाठी त्यागीन.

प्रेम हा व्यवहार नाहीय, आणि तो आपण नाही केलाय
प्रेम आपण टिकवलंय, आणि प्रेमात त्यागही केलाय 
आपलं प्रेम शुद्ध आहे, बावनकशी आहे,
मग तुला इतक घाबरायचं काय कारण आहे ?

या द्विधा मनःस्थितीत तू राहू नकोस
अशी बावरलेल्या नजरेने मला पाहू नकोस 😒
माझी हाक ऐक, तुला ऐकावीच लागेल,
माझ्या हाकेसरशी तुला यावंच लागेल.

जोपर्यंत आकाशात हा सूर्य तळपतोय 🌞
जोपर्यंत आभाळात हा चंद्र उगवतोय 🌝
आपल्या शपथा, आपली प्रतिज्ञा कधीच तुटणार नाही,
आपल्या आणा-भाका, आपली वचने कधीच मोडणार नाही. 

तू मला हाक दे, मी तुला साद देईन
माझ्या हाकेला, मी तुझी वाट पाहीन
दोघांनीही एकमेकांची साथ देऊया, 🚻
जो वादI केलाय दोघांनी, तो आपण निभावूया.

माझी कहाणी मी तुला सांगेन
तुझी कथा मग मी ऐकेन
जमान्याला ती आवडली तर ठीक आहे, 👍
लोकांना ती भावली तर ठीक आहे. 👍

कदाचित लोक आपल्या विरुद्ध जातील 🤞
आपल्या विरुद्ध जाऊन ते शिक्षाही करतील 🖐
पण यातूनही मार्ग काढूया, आपण सारी संकटे झेलूया,
जो वादI केलाय, तो आपण निभावूया.

साऱ्या लोकांना म्हणताना ऐकलंय
साऱ्या जगाला सांगताना ऐकलंय
कुणीही नाही परतुनी येत या जगात,
एकदा गेला की कायमचाच जातो तो परलोकांत.

पण आपल्या दोघांना वादI पूर्ण करायचाय
केलेला वादI आपल्याला निभावायचाय
त्यासाठी तुला परत यावंच लागेल,
तुझ्या शब्दाला तुला जागावंच लागेल .

खूप काळ समाजात घालवला आपण
बराच वेळ जीवनाला दिला आपण
पण आता ती वेळ आलीय जवळ,
पण आता ती वेळ येतेय समीप.

आपली केव्हाच झाली होती फारकत
आपली तेव्हाच झाली होती ताटातूट
पण तरीही मन मानत नाही,
पण तरीही मन उदासच राही. 😒

या मनाला मनविण्यासाठी आपण परत येऊया
या मनाची हाक आपण दोघेही ऐकुया
जो वादI केलाय तो आपण निभावूया,
आपण परतुनी येऊया, आपण भेटत राहूया.

आपण दोघेही कधीतरी एकत्र होतो 🚸
आपण दोघेही कधीतरी भेटत होतो
आपल्या प्रेमाने आपल्याला जवळ आणले होते,
आपल्या प्रेमाने आपल्याला एक केले होते.

आताही आपण एकत्र येऊ, आताही आपण भेटू 🚸
प्रेमाची रीतभात, प्रेमाचे चालचलन निभावत राहू
प्रेम हेच अंतिम ठिकाण जिथे आपण भेटत राहू,
पुन्हा पुन्हा एकमेकांना वचने देत राहू.

सच्च्या मनाने तू मला हाक दे
खऱ्या मनाने मी तुला हाक देईन
आपल्याला पुनः भेटावेच लागेल,
दिलेला शब्द आपल्याला पाळावाच लागेल.

आपल्या प्रेमाची हाक आपण ऐकुया
आपल्या प्रेमाला आपण पुन्हा एकदा ओळखूया
प्रेमात दिलेली सारी सारी वचने आपण पाळूया,
जो वादI केलाय, तो आपण निभावूया.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.03.2023-रविवार.
=========================================