हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-जेलहाउस रॉक

Started by Atul Kaviraje, March 19, 2023, 01:31:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                            --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील, जुन्या काळातील सुप्रसिद्ध पॉप गायक "एल्विस प्रिस्ले" यांचे  एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Jailhouse Rock"-"जेलहाउस रॉक"

                                   "जेलहाउस रॉक"
                                  ----------------

"Jailhouse Rock"
"जेलहाउस रॉक"
-------------------

वॉर्डनने जेलमध्ये पार्टी दिलीय
कारागृह वाद्यवृंदाने प्रवेश केलाय
आणि त्याने गायनात रंग भरलाय
वाद्यवृंद अक्षरशः उड्या मारतोय
कारागृहाच्या भिंती उसळू, हलू लागल्यात
आणि जेलमधील कैदी-पक्षी गाण्यावर उंच उडू लागलेत.

आपण रॉक करूया
प्रत्येकजण, सर्वांनी रॉक करूया
कारागृहाच्या सर्व खोल्या अवरोधित करूया
आणि सर्वानी जेलहाउस रॉकवर नाचूया.

स्पायडर मर्फीने छोटा सॅक्सोफोन चालविला
छोट्या जोने ब्रशचा स्लाईड ट्रॉम्बोन फुंकला 
इलिनोइस वरून आलेल्या मुलाने ड्रम
उडविला, तोडला, वाजवला, बडवला 
सारा ताल जांभळया टोळीने सांभाळला.

आपण रॉक करूया
प्रत्येकजण, सर्वांनी रॉक करूया
कारागृहाच्या सर्व खोल्या अवरोधित करूया
आणि सर्वानी जेलहाउस रॉकवर नाचूया.

४७ क्रमांकाने क्रमांक ३ ला सांगितले
सर्वात गोंडस कैदी-पक्षी म्हणून तुला ओळखले
माझी खात्री आहे तू तुझ्या मित्रांसोबत आनंदी असशील
ये, इथे ये, आणि तू माझ्याबरोबर जेलहाउस रॉक करू लागशील.

आपण रॉक करूया
प्रत्येकजण, सर्वांनी रॉक करूया
कारागृहाच्या सर्व खोल्या अवरोधित करूया
आणि सर्वानी जेलहाउस रॉकवर नाचूया.

दुःखी सॅक दगडाच्या ठोकळ्यावर बसला होता
सर्वांपासून दूर, एका कोपऱ्यात रडत होता
वार्डन म्हणाला, बडी, असा एकटा बसू नकोस, शांत हो
तुला सहकारी नाही मिळत, तर लाकडी खुर्चीवर विराजमान हो.

आपण रॉक करूया
प्रत्येकजण, सर्वांनी रॉक करूया
कारागृहाच्या सर्व खोल्या अवरोधित करूया
आणि सर्वानी जेलहाउस रॉकवर नाचूया.

शिफ्टिं हेनरी बग्सला म्हणाला, स्वर्गाच्या फायद्यासाठी हे आपण करूया
कुणी पाहत नाहीय, आपल्याला संधी मिळालीय, आपण कारागृह तोडूया
बगसी शिफटींकडे वळून म्हणाला, नाही नाही, काही नाही
मला इथेच थांबायचंय आणि आनंदाच्या प्रवाहात वाहत राहायचंय.

आपण रॉक करूया
प्रत्येकजण, सर्वांनी रॉक करूया
कारागृहाच्या सर्व खोल्या अवरोधित करूया
आणि सर्वानी जेलहाउस रॉकवर नाचूया.

जेलहाऊस रॉकच्या तालावर आपण नाचूया
जेलहाऊस रॉकच्या तालावर आपण नाचूया
जेलहाऊस रॉकच्या तालावर आपण नाचूया
जेलहाऊस रॉकच्या तालावर आपण नाचूया
जेलहाऊस रॉकच्या तालावर आपण नाचूया
जेलहाऊस रॉकच्या तालावर आपण नाचूया.

--एल्विस प्रिस्ले
--------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-आय.एम.डी.बी.कॉम)
                  ---------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.03.2023-रविवार.
=========================================