II गुढी पाडवा II-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, March 22, 2023, 10:35:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II गुढी पाडवा II
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०३.२०२३-बुधवार आहे. आज "गुढी-पाडवा आहे". शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुढीपाडव्याच्या काही हार्दिक शुभेच्छा.

                        गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--सण आला सौख्याचा पण काळजी घ्या
सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात
कोरोनाची करू नका साथ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

--नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा

--वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा

--यंदाही दिली नाही कोरोनाने भेटीची परवानगी
लांब राहून आपणही करूया त्याची रवानगी
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

--लांब असू आपण या वर्षीही नाही होणार गाठीभेटी
तरी गुढी उभारताना आईबाबा नक्कीच होईल इमोशनल तुमची बेटी
मिस यू आईबाबा...गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

--इंग्रजी नववर्षाच्या सुरूवातीला शुभेच्छा देण्यापेक्षा हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देणं जास्त महत्त्वाचं आहे.

--नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा

--चारी दिशांना आनंदाची आहे बहार..गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..दारी सजली आहे रांगोळी..आसमंतात आहे पतंगाची रांग..नववर्ष  तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं
आनंद होवो ओव्हरफ्लो..मस्ती कधीही न होवो लो..धनधान्याचा होवो वर्षाव..असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व

--ऋतूने बदलतं हिंदू वर्ष..नवं वर्ष येताच येते बहार..सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल..असं असतं नववर्षाचं हे पर्व

--तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..विद्या मिळो सरस्वतीकडून..धन मिळो लक्ष्मीकडून..प्रेम मिळो सगळ्यांकडून..पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..हॅपी गुडीपाडवा. 
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                     --------------------------------------------

------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2023-बुधवार.
=========================================