II गुढी पाडवा II-शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, March 22, 2023, 10:37:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     II गुढी पाडवा II
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०३.२०२३-बुधवार आहे. आज "गुढी-पाडवा आहे". शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुढीपाडव्याच्या काही हार्दिक शुभेच्छा.

                       गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--दिवस उगवतो दिवस मावळतो वर्ष येतं वर्ष जातं पण प्रेमाचे बंध कायम रहातात, आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा, सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

--गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी, चैतन्य आहे आज सर्वदारी...चला उत्साहाने साजरा करू नववर्षाचा हा आनंदोत्सव...शुभ गुढीपाडवा.

--तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..समृद्धीची गुढी उभारू द्वारी. गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा.

--आयुष्य एका स्वप्नासारखे जगावे..प्रत्येक संवेदनेला जगून पाहावे..नववर्षाची नवी पहाट अनुभवताना..आपल्या सर्वांना मिळो नवी वाट..हॅपी गुढीपाडवा

--जुन्या गोष्टी मागे सोडून, स्वागत करूया नववर्षाचे, प्रगतीने आणि उत्साहाने भरलेले असो..तुमचे नववर्ष हे येणारे

--गुढीपाडवा आला आहे सुखसमृद्धीचा क्षण आला आहे नवा प्रवास नवा ध्यास घेऊन आला आहे आजचा दिवस खास

--नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र, चांदीचा तांब्या, कडुनिंबाची पानं, साखरेची माळ, अशी उभारूया समृद्धीची गुढी. नववर्षाभिनंदन.

--नूतन वर्षाच्या तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लक्षलक्ष शुभेच्छा.

--समृद्धीच्या गुढीसोबतच उभारूया विश्वास आणि प्रेमाची गुढी, मनातली काढूया अढी, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

--रेशमी गुढी, कडुनिंबाचं पान, हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान, आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला नववर्षानिमित्त सदिच्छा. हॅपी गुढीपाडवा.
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2023-बुधवार.
=========================================