II गुढी पाडवा II-शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, March 22, 2023, 10:41:31 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II गुढी पाडवा II
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०३.२०२३-बुधवार आहे. आज "गुढी-पाडवा आहे". शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुढीपाडव्याच्या काही हार्दिक शुभेच्छा.

                      गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--श्रीखंडपुरीची लज्जत, गुढी उभारण्याची लगबग, सण आहे आनंदाच आणि सौख्याचा तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

--सण आला दारी, घेऊन शुभेच्छांची वारी, तुम्हाला जाओ नववर्ष छान, गुढीपाडवाच्या शुभेच्छा.

--सोनेरी सूर्याची सोनेरी किरणं घेऊन आली सोनेरी दिवस, आला नववर्षाचा सण घेऊन आला सोनेरी भरारी. नववर्षाभिनंदन.

--नववर्षाच्या आरंभाने होईल जुन्याचा नायनाट
अशीच सगळ्यांनी मिळून लावू कोरोनाची विल्हेवाट
यंदा उभारूया मास्कची गुढी
दूर करूया मनातली जुनी अढी
तुम्हा सर्वांना नववर्षाभिनंदन

--यशासोबतच यंदा कोरोनावर मात करू
जे होऊन गेले मागच्या वर्षी ते विसरू
आता नव्याने करू सुरूवात घेऊया
यशाची गुढी हातात.
गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा

--पुन्हा होईल सर्व सुरळीत सांगत आहे नववर्ष
दूर होईल मनावरचं मळभ आणि होईल हर्ष
आनंदी राहा आणि गुढीपाडवा साजरा करा

--घरीच राहू, गुढी उभारू, मग कशाला कोरोनाची भीती, सगळ्यांना आरोग्यदायी नववर्षाच्या शुभेच्छा 

--वडिलधाऱ्यांचा करा सन्मान..लहान्यांना द्या प्रेम..याच संकल्पाने करा नववर्षाचा जल्लोष
आली आहे बहार नाचूया गाऊया..एकत्र येऊन आनंद साजरा करूया..निसर्गाची किमया अनुभवूया..एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया.

--निळ्या आभाळात शोभते उंच गुढी..नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी..गुढीपाडव्याच्या लाखलाख शुभेच्छा.

--नवीन पालवी आल्याने वृक्ष आहे आनंदी..अशाच मौसमात होते नवी सुरूवात..हॅपी न्यू ईयर साजरा नका करू..निसर्गाचा आनंदोत्सव असलेला हा गुढीपाडवा साजरा करूया
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                     --------------------------------------------

------संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.03.2023-बुधवार.
=========================================