२३-मार्च-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, March 23, 2023, 09:50:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२३.०३.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "२३-मार्च-दिनविशेष"
                                   --------------------

-: दिनविशेष :-
२३ मार्च
जागतिक हवामान दिन
शहीद स्मृती दिन
पाकिस्तानचा प्रजासत्ताक दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९९
पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना 'पद्मविभूषण' सन्मानाने गौरविेण्यात आले.
१९९९
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना 'पद्मश्री' सन्मान प्रदान करण्यात आला.
१९९८
अभिनेते दिलीपकुमार यांना 'निशान-ए-इम्तियाज' हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
१९८०
प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.
१९५६
पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
१९४०
संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत
१९३१
सॉन्डर्सचा वध करणार्‍या भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६८
माईक अ‍ॅथरटन – इंग्लिश क्रिकेटपटू
१९५३
किरण मुजूमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक
१९३१
व्हिक्टर कॉर्चनॉय – रशियन बुद्धीबळपटू
१९२३
हेमू कलाणी – क्रांतिकारक
(मृत्यू: २१ जानेवारी १९४३)
१९१६
हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य
(मृत्यू: १ ऑगस्ट २००८)
१९१०
डॉ. राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक. १९३२ मधे 'मिठाचा सत्याग्रह' या विषयावरील प्रबंधाकरता त्यांना बर्लिन विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली. इंग्रजीचे ते उत्तम जाणकार होते. मात्र त्यांना इंग्रजीची गुलामी मान्य नव्हती. इंग्रजी येत असुनही 'अंग्रेजी हटाओ' ही चळवळ त्यांनी चालविली होती.
(मृत्यू: १२ आक्टोबर १९६७)
१८९८
नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका
(मृत्यू: २४ डिसेंबर १९७७)
१८८३
राष्ट्रकवी गोविंद पै
मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक, इतिहास व तत्त्वज्ञानाचे व्यासंगी, त्यांना कन्‍नड, कोंकणी, इंग्लिश, तुळू, संस्कृत, तेलुगू, तामिळ, मराठी, बंगाली, पर्शियन, पाली, ऊर्दू, ग्रीक, जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्‍नडमध्ये भाषांतर केले.
(मृत्यू: ६ सप्टेंबर १९६३)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०११
एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री
(जन्म: २७ फेब्रुवारी १९३२)
२००८
गणपत पाटील – मराठी चित्रपट कलाकार
(जन्म: ? ? १९१८?)
१९३१
शहीद 'भगत सिंग' – क्रांतिकारक
(जन्म: २८ सप्टेंबर १९०७)
१९३१
शहीद 'सुखदेव' थापर – क्रांतिकारक
(जन्म: १५ मे १९०७)
१९३१
शहीद शिवराम हरी 'राजगुरू' – क्रांतिकारक
(जन्म: २४ ऑगस्ट १९०८)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.03.2023-गुरुवार.
=========================================