माणसाची कविता-गीत-जंगली म्हणा, कोणी जनावर म्हणा, पण मी नाहीय मित्रांनो माणूसघाणा

Started by Atul Kaviraje, March 26, 2023, 12:34:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, एका माणसाची कविता-गीत ऐकवितो. "याहू... याहू, चाहे कोई मुझे जंगली कहे"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. मार्च महिन्याची ही रविवार-दुपार आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (याहू... याहू, चाहे कोई मुझे जंगली कहे)
----------------------------------------------------

         "जंगली म्हणा, कोणी जनावर म्हणा, पण मी नाहीय मित्रांनो माणूसघाणा !"
        ---------------------------------------------------------------

जंगली म्हणा, कोणी जनावर म्हणा,
पण मी नाहीय मित्रांनो माणूसघाणा !
मला ओळखण्यात तुमची चूक होतेय,
माझा आहे सदैवच मित्रत्त्वाचा बाणा !

जंगली म्हणा, कोणी जनावर म्हणा,
पण मी नाहीय मित्रांनो माणूसघाणा !
मला ओळखा, माणुसकीने पहा,
तुमच्यासारखाच मीही माणूस आहे, हेच जाणा !

तुमच्या नजरेत मी असाच असेन
तुम्हाला जर मी आवडतंच नसेन
पण याला काही माझंI इलाज नाही,
कुणाचंही तोंड मी बंद करू शकत नाही.

मी प्रेमाचा जलजला निर्माण करतो 🌊
मी प्रेमाचे तुफान घेऊन फिरतो 🌀
तुम्हाला फक्त मी घोंघावतं वादळ वाटतो, 💨 🌀
तुम्हाला वाटतंय तसा मी कधीच नसतो.

माझ्या छातीतही एक दिल धडकतंय ❤️‍‍
माझ्या मनातही कुठेतरी प्रेम दडतंय
तुम्हाला ते नाही येत समजून, 
उघड्या डोळ्यांनाही ते नाही येत दिसून. 👀

मला नाही ओळखलंत अजुनी तुम्ही
मला नका समजू फक्त दगड तुम्ही
मीही एक माणूस आहे, आदमी आहे, 🙏
मीही तुमच्यासारखाच एक इन्सान आहे.

मी माझा स्वतःचा मार्ग निवडतो
सर्वांना मी माझ्याबरोबर घेतो
मला कुणी नाही आपला परका,
प्रत्येकजण मग माझ्याबरोबरच चालतो. 👣

मला पाहून सारे आहे भरतात
कुठली आग आहेस तू मला विचारतात 🔥
झोपलेला दचकून जागा होतो,
माझ्यापासून दूर जाऊ लागतो.

लोकांचा काही गैरसमज झालाय
जणू डरकाळ्या फोडणारा वाघच आलाय
पण मला काहीच नाही त्याचे,
लोकांनीच मला जंगलीचा मुखवटा घातलाय.

मी मुक्त आहे, मी स्वतंत्र आहे
मोकळया आभाळाखाली मी बिनधास्त विहरत आहे
लोकांच्या नजरेत असेन मी जंगली जरी,
माझं वर्तन त्यांना वाटत असेल वेगळं जरी.

माझ्या हृदयात एक तुफान दबलंय 🌀
माझं मन तेव्हापासून बेचैन झालंय
लपविता येत नाही, सांगताही येत नाही,
मन माझं कसं द्विधा झालंय.

मीही एक हाडामांसाचा माणूस आहे
मलाही प्रेम करायचा अधिकार आहे
मलाही वाटतं प्रेम करावं, मन द्यावं, ❤️
कुणाच्यातरी नजरेत मीही भरावं.

माझं प्रेम जाहीर करण्यास मी का घाबरू ?
मी कशाला कोणाची पर्वा करू ?
मला एक संधी द्या, मित्रांनो,
माझ्याबद्दल विपरीत मत नका करू, मित्रांनो.

जंगली म्हणा, कोणी जनावर म्हणा,
पण मी नाहीय मित्रांनो माणूसघाणा !
मला ओळखण्यात तुमची चूक होतेय,
माझा आहे सदैवच मित्रत्त्वाचा बाणा !

जंगली म्हणा, कोणी जनावर म्हणा,
पण मी नाहीय मित्रांनो माणूसघाणा !
मला ओळखा, माणुसकीने पहा,
तुमच्यासारखाच मीही माणूस आहे, हेच जाणा !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.03.2023-रविवार.
=========================================