२९-मार्च-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, March 29, 2023, 10:19:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०३.२०२३-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "२९-मार्च-दिनविशेष"
                                   --------------------

-: दिनविशेष :-
२९ मार्च
राष्ट्रीय नौका दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९८२
एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
१९७३
व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.
१९६८
महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना
१९३०
'प्रभात'चा 'खूनी खंजिर' हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१८५७
बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. या घटनेतुनच १८५७ च्या राष्ट्रीय उठावाची सुरूवात झाली.
१८४९
ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९४८
नागनाथ कोतापल्ले – साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
१९४३
जॉन मेजर – इंग्लंडचे पंतप्रधान
१९३०
अनिरुद्ध जगन्नाथ – मॉरिशसचे पंतप्रधान
(मृत्यू: ३ जून २०२१)
१९२९
उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार
(मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३)
१९२६
पांडुरंग लक्ष्मण तथा 'बाळ' गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक
(मृत्यू: २१ मार्च २०१०)
१८६९
सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार
(मृत्यू: १ जानेवारी १९४४)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९७
पुपुल जयकर
पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या अभ्यासक आणि पुरस्कर्त्या, पद्मभूषण (१९६७)
(जन्म: ११ सप्टेंबर १९१५)
१९७१
धीरेंद्रनाथ दत्ता
धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी
(जन्म: २ नोव्हेंबर १८८६)
१९६४
शंकर नारायण तथा 'वत्स' जोशी – इतिहाससंशोधक
(जन्म: ? ? ????)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.03.2023-बुधवार.
=========================================