एक सांज

Started by शिवाजी सांगळे, March 30, 2023, 05:17:12 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

एक सांज

एक सांज डोकावते रोज रोज
कंदीलात वात तेवते रोज रोज

चर्चा अंधार दिव्याची न् हळवी
भेट ही सांज घडवते रोज रोज

शिण थकवा सर्व दिवसभराचा
दोघांचा सांज ऐकते रोज रोज

कष्ट, भक्तीचा मिलाफ होताना
भजनात सांज डुलते रोज रोज

सजवित मनी स्वप्ने उद्या करता
हलकेच सांज निजते रोज रोज

थकल्या वातीस या कंदीलाच्या
सहज पहाट जोजवते रोज रोज

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९