दिन-विशेष-लेख-भारतीय वायुसेना दल

Started by Atul Kaviraje, April 01, 2023, 11:32:00 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                "भारतीय वायुसेना दल"
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-01.04.2023-शनिवार आहे, 01 एप्रिल हा दिवस "भारतीय वायुसेना दल " म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     भारतीय वायुदल दिन (Air Force Day) दरवर्षी साजरा केला जातो. राष्ट्रीय सुरक्षा (National Security) आणि अधिकार बळकट करण्याचा प्रयत्न म्हणून आणि भारतीय वायुदल दिनाबद्दल (IAF) जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतात हा दिवस साजरा केला जातो. भारतीय वायुदलाला 90 वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने आपण याचा इतिहास आणि महत्त्वाविषयी जाणून घेणार आहोत.

           वायुसेना दिनाचा इतिहास (History of Air Force Day)--

     1932 मध्ये देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, त्यामुळे भारतीय वायु दलाला त्यावेळी 'रॉयल ​​इंडियन एअर फोर्स' असे नाव देण्यात आले होते. त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर त्यातून 'रॉयल' हा शब्द काढून 'इंडियन एअर फोर्स' करण्यात आला.

              कसा साजरा केला जातो हवाई दल दिवस ?--

     या दिवशी गाझियाबादमधील (Ghaziabad) हिंडन एअर फोर्स स्टेशनवर एका कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये लष्कराच्या अधिका-यांसह अनेक दिग्गज सामील होतात . या दिवशी महिला व पुरुष वैमानिकांची परेड आयोजित केली जाते. आकाशात शक्तिशाली विमानांचे प्रदर्शन केले जाते. या समारंभात हवाई दलाचे प्रमुख लष्करी जवानांचा पदक देऊन सत्कार करतात.

                  का साजरा केला जातो हा दिवस ?--

     हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश भारतीय वायु दलाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि देशाच्या हवाई सीमांच्या सुरक्षेसाठी भारतीय वायु दलाची प्रतिबद्धता दर्शवणे हा आहे.

                  भारतीय वायुदल बद्दल घ्या जाणून--

     भारतीय वायु दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल आहे. गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथे असलेले हिंडन एअर फोर्स स्टेशन आशियातील सर्वात मोठे आहे. भारतीय वायुसेनेच्या स्थापनेपासून ते 'नभ: स्पृशं दीप्तम्' या ब्रीदवाक्याचे अनुसरण करत आहे. याचा अर्थ 'अभिमानाने आकाशाला स्पर्श करणे.' वायुसेनेचे हे ब्रीदवाक्य भगवद्गीतेच्या 11 व्या अध्यायातून घेतले आहे. भारतीय हवाई दलाचा रंग निळा, आकाशी आणि पांढरा आहे.

--India.com News Desk
Edited by-Mohini Vaishnav
------------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इंडिया.कॉम)
                     -------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.04.2023-शनिवार.
=========================================