दिन-विशेष-लेख-राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन-अ

Started by Atul Kaviraje, April 05, 2023, 12:02:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                               "राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन"
                              ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 05.04.2023-बुधवार आहे, ५ एप्रिल हा दिवस "राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन   " म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     भारतामध्ये दरवर्षी ५ एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिवस (National Maritime day) पाळला जातो.

     सर्व जगभरात आठ जून हा दिवस 'सागरी दिन' म्हणून साजरा करावा, अशी संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ साली घोषणा केली. त्यानुसार 'दी ओशन प्रोजेक्ट' व 'दी वर्ल्ड ओशन नेटवर्क' या संघटना संयुक्तपणे आठ जून या दिवशी जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये 'सागरी दिना'च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपण भूतलावर ज्या सहजपणे वावरतो, तशाच सहजपणाने समुद्राकडेही आपण पाहावे, त्याबाबत गंभीरपणे विचार करावा, असा ढोबळमानाने या दिवसाचा उद्देश सांगता येईल.

''गुढी पाडव्याला तुम्ही सागरी संस्कृतीची आपल्या सर्वाना ओळख व्हावी म्हणून कार्यक्रम केला होतात ना? मग आता पुन्हा सागरी दिनाच्या निमित्ताने काय करणार?''

     ''अहो, दोन कार्यक्रमांच्या उद्देशात मूलभूत फरक आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही आपला धार्मिक सांस्कृतिक उत्सव व वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. त्या प्रसंगी आपल्या सागरी बांधवांच्या ज्ञानाचा वापर करून त्यांना कॅन्सरग्रस्तांच्या हृदयात प्रेमाची गुढी उभारता यावी, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. जागतिक सागरी दिनाच्या आपल्या धार्मिक सांस्कृतिक संदर्भाशी काही संबंध नाही. तो जागतिक पातळीवरील कार्यक्रम आहे.''

     ''मग तो साजरा करण्यासाठी तुम्ही काहीतरी भन्नाट कल्पना वापरली असेल?''

     ''भन्नाट होती का ते माहीत नाही, पण अभिनव मात्र नक्की होती. आमची सर्व समविचारी मित्र मंडळी आठ जून रोजी सकाळी साडेसात ते साडेदहा या काळात कच्छ, कोचीन, कलकत्ता व पुढे मिझोरामपर्यंत प्रत्येक ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यावर जमली आणि आपल्या चिरंतन सख्याला, सागराला, त्यांनी प्रणाम केला. त्याच्या पाण्यात पाय बुडवले व ओंजळभर पाणी आपल्या तोंडावरून फिरवले. आपल्या भारतमातेच्या सागरकिनाऱ्यावर ही प्रेममाला वाहण्याचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. असा प्रयोग प्रथमच झाला. भारतातील प्रत्येक सागरतीरावर त्या कालावधीत आमची स्नेहीमंडळी व स्थानिक एकत्र जमून सागराला वंदन करतील, याचे आम्ही व्यवस्थित नियोजन केले होते.''

     ''याने काय साध्य झाले? एक दिवसाच्या नमस्काराने चाचेगिरी, समुद्री दहशतवाद, स्मगलिंग थांबणार आहे का? की समुद्रातील प्रदूषण एकदम थांबणार आहे?''

     ''तुम्ही तर एक दिवसाच्या नमस्काराकडून चमत्काराची अपेक्षा करू लागतात. जगात जर असे चमत्कार घडायचे असतील तर, ज्ञान आणि विज्ञान कशाला पाहिजे? लोक सिद्धी प्राप्त करतील व चमत्कारांच्या बळावर हवं ते मिळवतील. पण असं घडताना दिसत नाही ना? सातत्यपूर्ण प्रगती करायची असेल तर चिकित्सक ज्ञान व वैज्ञानिक संशोधन या दोन्हींची कास धरायला हवी. पण आपण इतिहास, पुराणे यांच्याकडे शोधक बुद्धीने बघत नाही आणि त्यांच्यातून काहीही धडे घेत नाही.''

--डॉ. मीनल कातरणीकर
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                    ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.04.2023-बुधवार.
=========================================