II श्री हनुमान जयंती II-योगी हनुमान-कविता-3

Started by Atul Kaviraje, April 06, 2023, 01:15:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II श्री हनुमान जयंती II
                                  ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०४.२०२३-गुरुवार आहे. आज "हनुमान जयंती" आहे.  हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी हनुमान जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर काही कविता.

                                 "मी हनुमान सेवक...!"
                                --------------------- 

अरे हनुमंता थांब करू नको त्वरा

करू दे मला थोडा आराम जरा

जंगलाची रीत न्यारी देवा

अजूनही वाटतो मला हेवा


तिथे झाड फांदी बुडास होती

हाती तोंडी फळांची रास होती

कोसा कोसावर पाण्याची सोय होती

आडोशाला कडेकपारी मजबूत होती


नजरेत सारे आलबेल होते

मस्तमजेत जीवन सरत होते

आता देवा दिवस बदलले

सारे मनसुबे हवेत विरले


तू म्हणालास तेच खरे ठरले

आता जीवन नावा पुरते उरले

म्हणून म्हणतो थांब देवा

करू नको फुका कांगावा


भाकर तुकडा मिळतो का बघतो

मगच तुझ्याकडे दिमतीला येतो

चाकरी असली तुझी जरी

भाकरी लागते पोटास खरी


तुझं काय देवा नो हरी नो वरी

कटीस नेसून पीतांबर भरजरी

आमचं मात्र इथं स्वागत होत

हातात काठी घेऊन घरो घरी

म्हणून म्हणतो थांब जरा

करू नको उगा त्वरा.....!!!

--प्रशांत शिंदे
------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.04.2023-गुरुवार.
=========================================