सर्वोत्तम मराठी विनोद...भाग ३

Started by pomadon, October 02, 2010, 02:46:28 AM

Previous topic - Next topic

pomadon


लक्ष !
शिक्षक : बाळू, वर्गात थोड लक्ष देतोस का ?
बाळू : सर, मी शक्य तितक कमीच लक्ष देतोय.

बाप रे !
अरे तुला रडायला काय झालं ?
तो हत्ती आज मेला.
तर काय तो हत्ती तु पाळलेला होता कां ?
नाही, त्याला पुरायला खड्डा खणायला मला सांगण्यात आलय.

स्वप्ने बघा !
बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.
राजु : हो बाबा.
बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?
राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना.
त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल.
म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना.

प्रार्थना.
शिक्षक : राजू तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का ?
राजू : नाही सर, तशी गरज नसते. माझी आई फार चांगला स्वयंपाक करते.

मैत्री !
सुरेश : नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां ?
नरेश : हो, देईन ना .
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां ?
नरेश : हो. का नाही.
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल ?
नरेश : नाही.
सुरेश : का नाही ?
नरेश : माझ्याकडे खरच पाच हजार रुपये आहेत !!!

सरदार !
तुमचा एक मित्र सरदार आहे.
बर.
त्याला शनिवारी हसवायचे आहे.
तुम्ही काय कराल.
.
.
विचार करा
.
.
.
त्याला मंगळवारी जोक सांगा !!!!!
_____________________________________________________________
from internet.....