II गूड फ्रायडे II-चला चला जाऊ, जगाचा उद्धारक पाहू-कविता-1

Started by Atul Kaviraje, April 07, 2023, 11:18:49 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गूड फ्रायडे II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज "गूड फ्रायडे" आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व ख्रिस्ती भाऊ-बहीण कवी-कवयित्रीं यांनी हा दिवस स्मरणात ठेवावा. चला वाचूया, काही कविता.

                          "चला चला जाऊ, जगाचा उद्धारक पाहू"
                         ------------------------------------

परमोच्चावर गौरव शांती
ह्या धरणीवरती,
कृपा नरावर, परमोत्साहे
देवदूत गाती.
प्रतिध्वनीने ग्रह हे सारे
व्योमी द्न्दणती:
चला गीत हे
आपण ही गाऊ

चला चला जाऊ,
जगाचा उद्धारक पाहू

भविष्यवादी स्वर्गी सारे
लागती नाचाया,
साधे भोळे मेंढपाळही
लागती धावाया
पुर्वेकडूनी साधू निघाले
प्रभूला भेटाया,
चला दर्शना
आपणही जाऊ

चला चला जाऊ,
जगाचा उद्धारक पाहू

प्रीती आली देह धरोनी
आम्हा ताराया,
हस्त धरोनी मृतास आम्हा
पुनरपि उठवाया,
जय जय येशु ह्या मधुघोषे
भुवना व्यापाया;
प्रभूला हृदयी
साठवूनी घेऊ

चला चला जाऊ,
जगाचा उद्धारक पाहू

--सूरज
-------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी गाणी.इन मराठी)
                 -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.04.2023-शुक्रवार.
=========================================