कविता-तुला भेटण्यास तरसतोय जीव, तुझी मला आज भासतेय उणीव !

Started by Atul Kaviraje, April 08, 2023, 09:29:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रियेची आपल्या प्रियकरास भेटण्याची तळमळ यावर आधारित           कविता-गीत ऐकवितो. "अब आन मिलो सजना, आन मिलो, आन मिलो सजना"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. एप्रिल महिन्याची ही शनिवार-रात्र आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (अब आन मिलो सजना, आन मिलो, आन मिलो सजना)
----------------------------------------------------------------

             "तुला भेटण्यास तरसतोय जीव, तुझी मला आज भासतेय उणीव !"
            ---------------------------------------------------------

तुला भेटण्यास तरसतोय जीव,
तुझी मला आज भासतेय उणीव !
माझे प्रेम तूच आहेस, तूच माझा श्वास, 💟
तुझ्यावाचून जीवनात नसेल कोणतीच आस.   

तुला भेटण्यास तरसतोय जीव,
तुझी मला आज भासतेय उणीव !
तुझ्या प्रेमाने मला खरा मार्ग दाखवलाय, 🏞
तुझ्या प्रेमानेच करून दिलीय मला जाणीव !

पहा, बाग कशी बहरून आलीय
रंगीबेरंगी फुले डहाळ्यांवर झुलून राहिलीय 🍀🌺 🌹 🥀🌿🌷🌾🌾
सरसरता पवन त्यांना कसा खेळवतोय, 🍃
फुलांचा मादक सुगंध सारीकडे पसरवतोय. 🌹 🍀🌺

पण माझं मन या बागेत नाही लागतं
मला कुठलंच फुल आकर्षित नाही करतं 🍀🌺
हे सप्तरंग मला मोहात नाही पाडत,
तू नाहीस तर सारंच बेरंगी वाटतं.

तुझी फारच कमी जाणवतेय, साजणा
आता तरी येऊन भेट ना मला
तू आलास तर माझं जीवन होईल सतरंगी,
जीवन जगण्यास मजा येईल बहुरंगी, बहुढंगी. 👍

बघ, ठिकठिकाणी दिवे कसे प्रकाशलेत
त्यांच्या तेजाने पथ कसे उजळलेत
प्रत्येक ज्योतीवर पहा पतंगा कसा झेप घेतोय,
जणू त्यांच्यासवे तो फडफडते नृत्य करतोय.

पण आज माझ्यासवे कुणीच नाही 🤦‍♂️
माझ्या मनाचा रुसवा दुणावत राही 😒
साऱ्यांनी आपापले निवडलेत जोडीदार, 🚻
तुझ्यावाचून मी दुःखीच आहे फार. 😂

तुला किती शोधले, पण तू नाही मिळालास
तुला कुठेकुठे पाहीले, पण तू नाही गवसलास
शोधून शोधून तुला थकले रे मी, साजणा,
तरी माझ्या पावलांना नाही रे उसंत, साजणा. 👣

आज तुझ्यावाचून माझे अंगण सुने आहे
ती डहाळीवरली कोकिळाही आज गप्पच आहे 🐦
झाडे डोलत नाहीत, पक्षी खेळत नाहीत, 🌳🌴 🕊
वाराही अंगणात वाहण्यास नकार देत आहे.

पहा, बागा फुलांनी नुसत्या बहरुन आल्यात 🍀🌺 🌹 🥀🌿🌷🌾🌾
पहा, फांद्या फळांनी कश्या रसरसून झुलल्यात 🍏 🍎 🍐 🍊 🍋 🍌 🍉 🍇 🍓
जिवंतपणा कणाकणात ओतप्रोत वहात आहे,
अशात, माझं उदास मन फक्त तुझीच वाट पाहत आहे. 😒

सर्वजणी कश्या बघ नटून थटून बागडताहेत
आपल्या प्रियकरास भेटण्यास त्या पाणवठयावर जाताहेत
सर्वत्र आनंदाचा मेळाच भरलाय, जत्रा भरलीय, 😊😃
पण मला आज ती तुझ्यावाचून सुनीच भासू लागलीय.

आता माझी परीक्षा पाहणे तू बंद कर
दूरवरून छपून न्याहाळणे मला तू बंद कर
मला आता या साऱ्यांचा पहा कंटाळाच आलाय,
आता मला अधिक तरसवणे तू बंद कर.

साऱ्या मैत्रिणी माझ्या नेहमी भवती असतात
सर्व मैत्रिणी माझ्या नेहमी बरोबर असतात
तुला पहाणेही तेव्हा मला दुरापास्त होतं असतं,
तुला विचारणेही मला तेव्हा लाजिरवाणं वाटत असतं.

माझ्या साऱ्या रात्री आज एकट्यानेच सरताहेत 🌃🌃
एकामागोमाग दिवसही पहा कसे उलटताहेत 🌅
पण अजुनी तुझा काहीच पत्ता नाही,
पण माझ्या आशा मला एक किरण दाखवताहेत.

तुझी वाट पाहून नयन थकलेत, शिणलेत 👀
तुजसाठी केलेले सोळा शृंगारही फिके पडलेत
बिंदिया आता चमकत नाही, बांगडया आता खनकत नाहीत,
तुझ्या परतण्याचे सारेच मार्ग ओसाड भासू लागलेत. 🏞 🏘

तुला भेटण्यास तरसतोय जीव,
तुझी मला आज भासतेय उणीव !
माझे प्रेम तूच आहेस, तूच माझा श्वास, 💟
तुझ्यावाचून जीवनात नसेल कोणतीच आस.   

तुला भेटण्यास तरसतोय जीव,
तुझी मला आज भासतेय उणीव !
तुझ्या प्रेमाने मला खरा मार्ग दाखवलाय,
तुझ्या प्रेमानेच करून दिलीय मला जाणीव !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.04.2023-शनिवार.
=========================================