दिन-विशेष-लेख-जलसंधारण दिन

Started by Atul Kaviraje, April 09, 2023, 10:19:06 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                                  "जलसंधारण दिन"
                                 -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-09.04.2023-रविवार आहे, 09 एप्रिल हा दिवस "जलसंधारण दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     महाराष्ट्र सरकारने त्यांचा स्मृतिदिन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 'जलसंधारण दिन' म्हणून घोषित केलेला आहे.

     आज जलसंधारण दिवस. राज्याला जलसमृद्ध करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांतीची बीजे रोवली. त्यांनी जलसंधारण खात्याची निर्मिती करून महाराष्ट्राला जलसमृद्धीची दिशा दिली. आज जलसंधारण दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात. जलसंधारण दिन दुष्काळावर मात करण्यासाठी आणि अधिकाधिक कृषी क्षेत्र नियोजनबद्ध सिंचनाखाली आणण्यासाठी क्रांतिकारी व दूरगामी स्वरूपाचे धोरणे माजी मुख्यमंत्री नाईक यांनी आखले होते. आपले संपूर्ण आयुष्य जलसंधारणासाठी वेचणारे 'पाणीदार माणूस' म्हणून ही सुधाकरराव नाईक यांची ओळख आहे.

     त्यांनी 'पाणी अडवा पाणी जिरवा' हा मूलमंत्र दिला. पाण्याचे योग्य नियोजन व संवर्धन न झाल्यास महाराष्ट्राचे वाळवंट होईल. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन शास्त्रीय पद्धतीने पाण्याचे संवर्धन करण्यासाठी नाईक यांनी जलसंधारणाची चळवळ सुरू केली. मोठ-मोठी धरणं बांधण्यापेक्षा जलसंधारणाची छोटी आणि मध्यम कामे पूर्ण करून जास्त शेतजमीन सिंचनाखाली येऊ शकते आणि अशा प्रकल्पांमुळे शेतकरी निराधार होत नाही, भूमिहीन होत नाही, पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण होत नाहीत, असे ते तेव्हा सांगत असे.

     जलसंधारण चळवळीसाठी स्वतःला एवढे झोकून दिले की, तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. दुर्दैवाने त्यांची प्रकृती सावरू शकली नाही आणि त्यांचे निधन झाले. राज्याला एक दिशा देणारे नेतृत्व हरपले; पण जलसंधारण रूपाने ते आपल्यात आजही आहेत. 🔷 दरम्यान, सुधाकरराव नाईक यांच्या प्रेरणादायी कामगिरीच्या स्मरणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा महाराष्ट्रात आजचा दिवस सर्वत्र 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जातो.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मी मराठी.कॉम)
                   ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.04.2023-रविवार.
=========================================