II ईस्टर संडे II-मी वेचीले फुलांना कांटे ख्रिस्ता मिळाले-कविता-2

Started by Atul Kaviraje, April 09, 2023, 10:34:04 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II ईस्टर संडे II
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०९.०४.२०२३-रविवार आहे. आज "इस्टर संडे" आहे. ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी ४० दिवसांच्या उपवासाचा (लेन्ट) हा काळ संपतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व ख्रिस्ती भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना इस्टर संडे च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर काही कविता.

     Praise The Lord. मी वेचिले फुलांना' यह एक marathi christian song हैं. इस गीत को गाया है संजय सावंत और अंजलि नंदगावकर ने. तो आइए इस गीत के जरिए हम भी प्रभु की महिमा करे.

                          "मी वेचीले फुलांना कांटे ख्रिस्ता मिळाले"
                         -----------------------------------

मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले......... 2
जखमी करुनि तुझला मला सर्व रे मिळाले........... 2

1)
हाती पायी खोल तुझिया
रुतले खिळे धुतारी......... 2
मी रोग मुक्त झालों
फटके तुला मिळाले
जखमी करुनि तुझला मला सर्व रे मिळाले........... 2

2)
पाहुनी येशू तुझला
धिक्कारले जगाने......... 2
पावे कृपा मी आता
शापच तुला मिळाले
जखमी करुनि तुझला मला सर्व रे मिळाले........... 2

मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले......... 2
जखमी करुनि तुझला मला सर्व रे मिळाले........... 2
मला सर्व रे मिळाले........... 2

==============================
song : मी वेचिले फुलांना, Mi Venchile Phulana
singer : Sanjay Sawant and Anjali Nandgaonkar
lyrics : -
music : Atul and Digambar
label : THOMSUN HYMNS
==============================

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-येशू की महिमा.इन) 
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.04.2023-रविवार.
=========================================