II ईस्टर संडे II-आसवांना कळेना मोल माझ्या प्रभूचे-कविता-4

Started by Atul Kaviraje, April 09, 2023, 10:37:27 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II ईस्टर संडे II
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०९.०४.२०२३-रविवार आहे. आज "इस्टर संडे" आहे. ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी ४० दिवसांच्या उपवासाचा (लेन्ट) हा काळ संपतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व ख्रिस्ती भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना इस्टर संडे च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर काही कविता.

     Praise the Lord. आसवांना कळेना, Aaswana Kalena Lyrics, marathi Christian song

                           "आसवांना कळेना मोल माझ्या प्रभूचे"
                          ---------------------------------

आसवांना कळेना मोल माझ्या प्रभूचे --(2)
तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला --(2)

1.
ऐकली ना कोणी त्रूषार्थ त्याची वाणी --(2)
पाहिली ना कोणी अघोर वेदना ही
तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला --(2)

आसवांना कळेना मोल माझ्या प्रभूचे --(2)
तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला --(2)

2.
धगधगत्या ऊन्हात एकटाच तो --(2)
क्रुसासी टांगलेला निष्पाप कोकरा तो
तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सूळी गेला --(2)

आसवांना कळेना मोल माझ्या प्रभूचे --(2)
तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला --(2)

=========================
1-Song- आसवांना कळेना,Aasawana Kalena
2-Singer- Mr. Vikas Samudre
3-Music- Mr. Pragat Powar
4-Lyrics- Mr. Pravan Powar
5-Label-   -
=========================

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-येशू की महिमा.इन) 
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.04.2023-रविवार.
=========================================