दिन-विशेष-लेख-जागतिक पार्किन्सन दिवस

Started by Atul Kaviraje, April 11, 2023, 09:01:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                                "जागतिक पार्किन्सन दिवस"
                               -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-11.04.2023-मंगळवार आहे, ११ एप्रिल हा दिवस "जागतिक पार्किन्सन दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     हा दिवस दरवर्षी 11 एप्रिल रोजी साजरा केला जातो. वास्तविक हा एक आजार आहे. त्यामुळे हालचालींचा वेग मंदावतो. स्नायू कडक होतात आणि शरीरात थरथरण्याची समस्या जाणवते.

         जागतिक पार्किन्सन दिन‌Iनिमित्ताने डॉक्टरांचा रुग्णांना सल्ला--

     पार्किन्सन आजारग्रस्त रुग्ण स्वतःच्याच विश्वात रममाण असतो, इतरांशी संवाद साधण्याची त्याला भीती वाटते, आत्मविश्वास डळमळतो, त्यामुळे हे रुग्ण समाजापासून तुटल्यासारखे राहतात.
     
     पार्किन्सन आजारग्रस्त रुग्ण स्वतःच्याच विश्वात रममाण असतो, इतरांशी संवाद साधण्याची त्याला भीती वाटते, आत्मविश्वास डळमळतो, त्यामुळे हे रुग्ण समाजापासून तुटल्यासारखे राहतात. मात्र, या आजारावर मात करण्यासाठी रुग्णांनी सर्वसामान्यांशी जोडून ठेवायला हवे. त्यांच्या निकटवर्तीयांनीही त्यांना याकामी मदत करावी, असा सल्ला मज्जारज्जू विकारतज्ज्ञांनी दिला आहे.

     या आजारामध्ये मेंदूतील सबस्टॅन्शिया नायग्रा या भागातील पेशी कमी होतात. त्यामुळे डोपा नावाचा मेंदूतील द्राव कमी होत जातो. हा द्राव संदेशवहनाचे काम उत्तमपणे करत असतो. त्याचे प्रमाण कमी झाले की मेंदूमध्ये संदेशवहन यंत्रणा हळुहळू निष्क्रीय होत जाते. त्यातून विस्मृती, हातपायांची थरथर, तोंडातून लाळ गळणे, चालताना तोल जाणे, लघवीवरचे नियंत्रण जाण्यासारख्या शारीरिक कृती रुग्णांच्याही नकळत घडतात. नकळत होणाऱ्या या कृतीमुळे पार्क‌न्सिनचा आजार असलेल्या व्यक्ती धास्तावलेल्या असतात. त्यातून त्यांचा समाजाशी, बाहेरच्या व्यक्तींशी संबध तुटतो.

     अशा व्यक्तींचा हा संपर्क तुटू नये यासाठी या रुग्णांच्या नातलगांनी तसेच कुटुंबीयांनी प्रयत्न करायला हवेत, असा सल्ला मज्जारज्जूतज्ज्ञ डॉ. मनोज रोहे यांनी दिला.

     या रुग्णांमध्ये हातापायाची थरथर होते, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास जातो, ही भीती घालवण्यासाठी त्यांना समुपदेशन, औषधोपचाराची मदत देणे गरजेचे असते. त्यासोबत विविध कार्यक्रमांमध्ये, सणसमारंभामध्ये या व्यक्तींचा सहभाग वाढवणेही गरजेचे असते. त्यातून एकटेपणा दूर होतो, असेही ते आवर्जून सांगतात.

                नव्या उपचारपद्धती--

     मेंदूतील डोपा द्रावाचे कमी झालेले प्रमाण वाढवण्यासाठी औषधे दिली जातात. मात्र, काही वर्षानंतर या औषधांची मात्रा वाढवावी लागते. अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार उपचारपद्धती आली आहे. त्यात मेंदूतल्या संदेशवहन करणाऱ्या भागाला लहरींच्या माध्यमातून उत्तेजित केले जाते. डीप ब्रेन स्टीम्युलेशन थेरपीचाही वापर करून पार्किन्सनच्या लक्षणांची तीव्रता कमी केली जाऊ शकते, असे जसलोक रुग्णालय व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. परेश दोशी यांनी सांगितले.

--म. टा. खास प्रतिनिधी
---------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.04.2023-मंगळवार.
=========================================