१२-एप्रिल-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 12, 2023, 08:44:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१२.०४.२०२३-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "१२-एप्रिल-दिनविशेष"
                                 ---------------------

-: दिनविशेष :-
१२ एप्रिल
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९८
C. Subramaniam
गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान.
१९९७
भारताचे ११ वे पंतप्रधान श्री. एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला. २१ एप्रिल १९९७ पर्यंत ते पंतप्रधानपदी होते.
१९९७
पूर्व प्राथमिक प्रवेशाकरता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर
१९६७
Kailash Nath Wanchoo
कैलाश नाथ वांछू यांनी भारताचे १० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६१
Yuri Gagarin
रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात १०८ मिनिटे भ्रमण करुन पृथ्वीप्रदक्षिणा केली.
१९४५
F. D. Roosevelt
अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.
१९३५
'प्रभात'चा 'चंद्रसेना' हा हिन्दी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता. [चैत्र शुद्ध प्रतिपदा - बलिप्रतिपदा]
१६०६
Union Jack
ग्रेट ब्रिटनने 'यूनियन जॅक'ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५४
Safdar Hashmi
सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार
(मृत्यू: २ जानेवारी १९८९)
१९४३
Sumitra Mahajan
सुमित्रा महाजन – इंदूरच्या महापौर, केंद्रीय मंत्री, १६ व्या लोकसभेच्या सभापती. या इंदूर लोकसभा मतदारसंघातून सलग ८ वेळा निवडुन आल्या आहेत.
१९३२
Laxman Kadirmagar
लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते
(मृत्यू: १२ ऑगस्ट २००५)
१९१७
विनू मांकड
विनू मांकड – पहिल्या क्रमांकापासून ते अकराव्या क्रमांकापर्यंत सर्व क्रमांकांवर फलंदाजी करण्याचा विक्रम. अशी कामगिरी करणारे फक्त तीनच खेळाडू आहेत. सर्वात कमी कसोटी (२३) सामन्यांमध्ये १००० धावा व १०० बळी घेण्याचा विक्रम. हा विक्रम बरीच वर्षे अबाधित होता. पुढे इंग्लंडच्या इयान बोथम यांनी २१ कसोटी सामन्यात ही कामगिरी करून तो विक्रम मोडला. एका कसोटी सामन्यात १० बळी घेणारे पहिले भारतीय गोलंदाज. १९५६ मध्ये पंकज रॉय बरोबार न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४१३ धावांची भागीदारी केली. हा विक्रम ५२ वर्षे अबाधित होता. नॉन स्ट्रायकर एन्डला असणारा ऑस्ट्रेलियाचा बिल ब्राऊन हा सारखा क्रीजच्या बाहेर जात असल्यामुळे मांकड यांनी त्याला धावबाद केले. बाद करण्यापूर्वी मांकड यांनी त्याला दोनदा ताकीद दिली होती. या नियमाला पुढे Mankading असे नाव पडले. १९४७ चे विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयर.
(मृत्यू: २१ ऑगस्ट १९७८)
१९१४
कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – 'सासरमाहेर', 'भाऊबीज', 'चाळ माझ्या पायांत' या चित्रपटांचे त्यांनी कथा, संवाद व गीतलेखन केले होते.
(मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९५)
१९१०
Purushottam Bhaskar Bhave
पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक
(मृत्यू: १३ ऑगस्ट १९८०)
१८७१
वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार. त्यांनी लहान मुलांसाठी 'आनंद' हे मासिक सुरू केले होते.
(मृत्यू: २ फेब्रुवारी १९३०)
१४८४
मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग [चैत्र व. ९]
(मृत्यू: १७ मार्च १५२७)
ख्रिस्तपूर्व ५९९
भगवान महावीर – जैनांचे २४ वे तीर्थंकर
(मृत्यू: ख्रिस्तपूर्व ५४९)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००६
Rajkumar
सिंगानाल्लूरू पुट्टस्वामी मुत्तुराजु तथा राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक
(जन्म: २४ एप्रिल १९२९)
२००१
Devang Mehta
भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचे ऑस्ट्रेलियात निधन
(जन्म: १० ऑगस्ट १९६०)
२००१
पै. चंबा मुत्‍नाळ – हिंदकेसरी
(जन्म: ? ? ????)
१९४५
फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: ३० जानेवारी १८८२)
१९०६
महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र 'न्यायरत्‍न' भट्टाचार्य
(जन्म: २२ फेब्रुवारी १८३६)
१८१७
Charles Messier
चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ
(जन्म: २६ जून १७३०)
१७२०
Balaji Vishwanath Bhat
बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा
(जन्म: १ जानेवारी १६६२)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.04.2023-बुधवार.
=========================================