१३-एप्रिल-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, April 13, 2023, 08:40:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१३.०४.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "१३-एप्रिल-दिनविशेष"
                                   ---------------------

-: दिनविशेष :-
१३ एप्रिल
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९४२
Prabhat Film Company
व्ही. शांताराम 'प्रभात फिल्म कंपनी'तून बाहेर पडले.
१९१९
जालियनवाला बाग हत्याकांड – रौलेट कायद्याच्या निषेधार्थ अमृतसर येथे झालेल्या सभेवर ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल हॅरी डायर याच्या नेतृत्वाखालील तुकडीने केलेल्या गोळीबारात ३७९ लोक ठार व सुमारे १२०० लोक जखमी झाले. [चैत्र शु. १३]
१८४९
हंगेरी प्रजासत्ताक बनले.
१७३१
छत्रपती शाहू (सातारा) आणि छत्रपती संभाजी (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरुन असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला. [चैत्र व. २]
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६३
Garry Kasporov
गॅरी कास्पारॉव्ह – रशियन बुद्धीबळपटू, ग्रॅण्डमास्टर
१९५६
Satish Kaushik
सतीश कौशिक – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक
१९४०
Nazma Heptullah
नजमा अकबर अली हेपतुल्ला – उपराष्ट्रपती, मणिपूरच्या राज्यपाल, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरू, भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष, ६ वेळा राज्यसभा खासदार
१९२२
Julius Nyerere
म्वालीमू ज्यूलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १४ आक्टोबर १९९९)
१९०६
Samuel Beckett
सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक
(मृत्यू: २२ डिसेंबर १९८९)
१९०५
Bruno Rossi
ब्रूनो बेनेडेट्टो रॉस्सी – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्‍या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: २३ नोव्हेंबर १९९३ - केम्ब्रिज, मॅसेच्युसेटस, यू. एस. ए.)
१८९५
V. R. Khanolkar
वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे
(मृत्यू: २९ आक्टोबर १९७८)
१८९०
V. R. Khanolkar
रामचंद्र गोपाळ ऊर्फ 'दादासाहेब तोरणे' – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक
(मृत्यू: १९ जानेवारी १९६०)
१७४३
Thomas Jefferson
थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपराष्ट्राध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला 'जेफरसनची लोकशाही' असे म्हणतात.
(मृत्यू: ४ जुलै १८२६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००८
दशरथ पुजारी
दशरथ पुजारी – संगीतकार
(जन्म: ३० ऑगस्ट १९३० - बडोदा, गुजराथ)
२०००
विश्वास नरहर तथा 'बाळासाहेब' सरपोतदार – चित्रपट निर्माते व वितरक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष
(जन्म: १९ डिसेम्बर १९३२)
विश्वास सरपोतदार
१९९९
डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले – कृषीतज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: ? ? ????)
१९८८
हिरामण बनकर – महाराष्ट्र केसरी
१९७३
Balraj Sahni
बलराज सहानी – अभिनेता व दिग्दर्शक
(जन्म: १ मे १९१३ – रावलपिन्डी, पाकिस्तान)
१९७३
अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक. त्यांनी संपादित केलेल्या विविध ग्रंथात रघुनाथपंडित कृत 'दमयंती स्वयंवर' व मुक्तेश्वरकृत 'महाभारताचे आदिपर्व' हे उल्लेखनीय आहेत.
(जन्म: ५ सप्टेंबर १८९५)
१९५१
भवानराव श्रीनिवासराव तथा 'बाळासाहेब' पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते
(जन्म: २४ आक्टोबर १८६८)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.04.2023-गुरुवार.
=========================================