दिन-विशेष-लेख-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती-1

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:52:20 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                             "डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती"
                            ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-14.04.2023- शुक्रवार आहे, १४ एप्रिल हा दिवस "डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती " म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झाला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झाला.

     आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल रोजी भारतसह संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. आयुष्यभर समानतेसाठी संघर्ष करणारे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समानता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जातात. यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा 'समानता दिवस' आणि 'ज्ञान दिन' म्हणून देखील साजरा केला जातो.

      समता दिन : आंबेडकर जयंती ही अमेरिका, कॅनडासह जगातील 4 राज्यांमध्ये 'अधिकृत दिन' आहे

     बाबासाहेब हे मानवी हक्क चळवळ, राज्यघटनेची निर्मिती, शोषितांचे थोर उद्धारक आणि त्यांच्या प्रकांड विद्वतेसाठी जगभरात ओळखले जातात. त्यांचा आदर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जन्मस्थान भीम जन्मभूमी (महू), बौद्ध धम्म दीक्षास्थळ दीक्षाभूमी (नागपूर), त्यांचे समाधी स्थळ चैत्यभूमी (मुंबई) आणि इतर अनेक स्थानिक ठिकाणी त्यांचे कोट्यवधी अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.

     आंबेडकरांची जयंती भारतातील सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि बौद्ध विहारांमध्ये देखील साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीशी संबंधित काही अज्ञात आणि रंजक तथ्ये जाणून घेऊया...

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बद्दल खास गोष्टी--

1) डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षी 100 हून अधिक देशांमध्ये साजरी केली जाते.

2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर न्याय व समानतेसाठी संघर्ष केला, म्हणून त्यांचा वाढदिवस भारतात 'राष्ट्रीय समता दिन' (Equality Day) म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस बर्‍याच कालावधीपासून 'आंतरराष्ट्रीय समता दिन' (International Equality Day) किंवा 'जागतिक समता दिन' (World Equality Day) म्हणून जाहीर करावा अशी संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) मागणी आहे.

3) इंडिया पोस्टने (भारतीय डाक) 1966, 1973, 1991, 2001 आणि 2013 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना समर्पित विशेष टपाल तिकिटे काढली होती. तसेच 2009, 2015, 2016, 2017 आणि 2020 मध्ये इतर टपाल तिकिटांवरही त्यांना चित्रित केले होते.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-धम्मा भारत.कॉम)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================