दिन-विशेष-लेख-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती-3

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:55:02 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                           "डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती"
                          ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-14.04.2023- शुक्रवार आहे, १४ एप्रिल हा दिवस "डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती " म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

12) आंबेडकर जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांची माहिती जगभरातल्या विविध भाषांमध्ये वाचली जाते, आणि यांमध्ये इंग्रजी, हिंदी आणि मराठी या पहिल्या तीन भाषा आहेत.

13) 14  एप्रिल 1928 रोजी पुणे शहरात सर्वप्रथम सार्वजनिकपणे आंबेडकर जयंती साजरी केली गेली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असलेले सदाशिव रणपिसे यांनी ही आंबेडकर जयंतीची प्रथा सुरू केली होती.

14) 2017 मध्ये बाबासाहेबांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने 14 एप्रिलला ज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.

15) 14 एप्रिल 2015 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 124व्या वाढदिवसासाठी Google डूडल प्रकाशित केले गेले. हे डूडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंगडममध्ये अशा तीन खंडांच्या 7 देशांमध्ये प्रसिद्ध केले गेले होते.

16) अमेरिकेतील (USA) कोलोरॅडो सरकारने आपल्या राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस 'डॉ. बी.आर. आंबेडकर न्यायबुद्धी दिन' (Dr. B.R. Ambedkar Equity Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

17) 13 एप्रिल 2022 रोजी, तामिळनाडू सरकारने राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस 'समानता दिवस' (Equality Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

18) 2022 मध्ये, न्यू जर्सी या अमेरिकन राज्यातील जर्सी सिटी या शहराच्या महानगरपालिकेने बाबासाहेबांचा जन्म दिवस 'समानता दिवस' (Equality Day) म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. world biggest jayanti in marathi

19) 2022 मध्ये, ब्रिटिश कोलंबिया राज्यातील city of Surrey या शहराच्या महानगरपालिकेने सुद्धा बाबासाहेबांचा जन्म दिवस 'समानता दिवस' (Equality Day) म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-धम्मा भारत.कॉम)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================