दिन-विशेष-लेख-राष्ट्रीय अग्निशामक दल दिन

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:56:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                             "राष्ट्रीय अग्निशामक दल दिन"
                            --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-14.04.2023-शुक्रवार आहे, १४ एप्रिल हा दिवस "राष्ट्रीय अग्निशामक दल दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     कोणताही दिवस साजरा करण्यामागे एक इतिहास दडलेला आहे. त्याच ऐतिहासिक दिवसाची आठवण व्हावी आणि देश संरक्षणाविषयी सैन्याने केलेल्या कामाची सर्वसामान्यांना जाणीव असावी म्हणूनच ऐतिहासिक महत्व असलेले दिवस साजरे करतात. त्याच अनुशंगाने आज देशभर राष्ट्रीय अग्नीसेवा दिवस साजरा केला जात आहे. भले आंतरराष्ट्रीय अग्नीशमन दिन हा दरवर्षी 4 मे रोजी साजरा होत असला तरी देशाच्या दृष्टीकोनातून 14 एप्रिलच्या एका घटनेमुळे देशात हा दिन तर साजरा होतो.

     कोणताही दिवस साजरा करण्यामागे एक इतिहास दडलेला आहे. त्याच ऐतिहासिक दिवसाची आठवण व्हावी आणि देश संरक्षणाविषयी सैन्याने केलेल्या कामाची सर्वसामान्यांना जाणीव असावी म्हणूनच ऐतिहासिक महत्व असलेले दिवस साजरे करतात. त्याच अनुशंगाने आज (India) देशभर (National Fire Service Day) राष्ट्रीय अग्नीसेवा दिवस साजरा केला जात आहे. भले आंतरराष्ट्रीय अग्नीशमन दिन हा दरवर्षी 4 मे रोजी साजरा होत असला तरी देशाच्या दृष्टीकोनातून 14 एप्रिलच्या एका घटनेमुळे देशात हा दिन तर साजरा होतोच पण (fire protection) आगीपासून बचाव कसा करावा या अनुशंगाने सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून 14 ते 20 एप्रिल दरम्यान अग्नीसुरक्षा सप्ताहाचेही आयोजन केले जात आहे. आपत्तीत अग्निशामक दलाचे जवानांचे बलिदान म्हणून अग्निशामक दिन साजरा केला जातो. या दिवशी अग्निशामक दलाच्या बलिदानाची खूण आणि सन्मान केला जातो. सन 2022 या वर्षीचे राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनाचे घोषवाक्य आहे "अग्निसुरक्षा शिका, उत्पादकता वाढवा".

...म्हणून भारतामध्ये 14 एप्रिल रोजी अग्निशमन दिन साजरा होतो

     आंतरराष्ट्रीय फायरफायटर डे हा 4 मे असला तरी भारतामध्ये 14 एप्रिल रोजी हा दिन साजरा केला जातो. कारण 1944 साली फोर्टस्टीकेन या मालवाहू जहाजाला अचानक आग लागली. या जहाजातून युद्धसामुग्री आणि स्फोटकांच्या कापसाच्या गाठींनी वाहतूक केली जात होती. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचे 66 जवान आगीच्या भक्ष्यस्थानी असल्याचे आढळून आले. देशातील ही सर्वात मोठी घटना होती. या जवानांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ देशात दरवर्षी 14 एप्रिल रोजी अग्निशमन दिन साजरा केला जात आहे.

               जनजागृतीसाठी अग्निसुरक्षा सप्ताहाचेही आयोजन--

     1944 च्या दुर्घटनेतील शहीदांच्या पराक्रमाची आवठवण व्हावी म्हणून सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालयांमध्ये हा राष्ट्रीय दीन साजरा केला जातो. राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त देशभरातून अग्निशमन दलाचे जवान शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटांचं मौन पाळतात. याशिवाय 14 ते 20 एप्रिल दरम्यान अग्निसुरक्षा सप्ताहही साजरा केला जातो. या दरम्यानच्या काळात नागरिकांना आगीमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती व्हावी, आगीपासून बचाव कसा करावा, खबरदारी कशी घ्यावी याचे प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर अग्निशमन यंत्रांचा वापर, आग लागल्यास प्रतिबंधात्मक उपाय, सुरक्षितता आदी बाबी शिकविल्या जातात.

          दुर्घटना टाळण्यामध्येही अग्निशमन दलातील जवानांचे योगदान--

     आजच्या आधुनिक भारतामध्येही आगीच्या घटना ह्या घडतच आहेत. अधिकतर घटना ह्या शॉर्टसर्किटमुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रसंगी जीवाची बाजी लावून अग्निशमन दलाचे जवान हे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होऊ नये किंवा मनुष्यहानी होऊ नये यासाठी जीवाची बाजी लावत असतात.आग लागल्यास अग्निसुरक्षा व खबरदारीचे सर्व उपाय करणे, उद्योगांमध्ये अग्निसुरक्षा व खबरदारीची व्यवस्था करणे, बहुमजली इमारतींमध्ये अग्निसुरक्षा व खबरदारीची व्यवस्था करणे, बहुमजली इमारतींमध्ये अग्निसुरक्षेची व्यवस्था करणे व अपंग व्यक्तींना अग्निसुरक्षेची व्यवस्था करणे हे देखील सर्वसामान्यांचे कर्तव्य आहे.

                आगीचे चार प्रकार अन् उपाययोजना--

– पहिली सामान्य आग म्हणजे सामान्य अग्नी कोळशाचे कापड आणि कागदी आग या प्रकारात मोडतात ते पाणी आणि कार्बन डायऑक्साइडने विझवतात.

– दुसरे तेल आग डिझेल आणि पेट्रोल या प्रकारात येते, ते डीसीपी एक्सटीगाझर आणि फोमद्वारे विझविले जाते.

– रसायने आणि वीज शॉर्ट सर्किट आणि इलेक्ट्रिकल आगीमुळे लागलेली आग या प्रकारात मोडते, डीसीपी आणि सीओ-2, एक्स्टीगरसह विझवते.

– धातूची आग कोणतीही धातूची आग या प्रकारात येते, ती डीसीपी CO-2 XTgizar द्वारे विझवली जाते. अशा पध्दतीने आगीचे हे प्रकार ओळखले तर अग्निशमनचे काम आणखी सोपे होईल.

--राजेंद्र खराडे
-------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ- टी.व्ही.९ मराठी.कॉम)
                  ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================