II बाबासाहेब आंबेडकर जयंती II-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:25:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II बाबासाहेब आंबेडकर जयंती II
                           ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज  "बाबासाहेब आंबेडकर जयंती" आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही शुभेच्छा.

              बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा--

=========================================
--सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
जय भीम

--दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून
गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
जय भीम

--हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
वेग होता...
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता....!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाही तर तर जगात एक होता....!
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
जय भीम  || जय शिवराय

--जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
'विद्यार्थी दिवस' म्हणून साजरा करतात,
अशा महान "विद्यार्थीची" जयंती आहे.
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
#भीमजयंती

--जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
||जय भीम ||

--निळ्या रक्ताची धमक बघ,
स्वाभिमानाची आग आहे..
घाबरू नकोस कुणाच्या बापाला,
तु भीमाचा वाघ आहेस...
जय भीम!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

--दगड झालो तर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालो तर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालो तर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल.
जय भीम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
=========================================

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी भाऊ.कॉम)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================