II बाबासाहेब आंबेडकर जयंती II-शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:28:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II बाबासाहेब आंबेडकर जयंती II
                            ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज  "बाबासाहेब आंबेडकर जयंती" आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही शुभेच्छा. 

     महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा पाठवून साजरी करा यंदाची भीम जयंती

         डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा--

=========================================
--राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला...
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!!!

--सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यानं
नसा नसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||

--जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय भीम!!!

--मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शतः शतः नमन चरणी त्यांचे...
असे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा
जय भीम!!!

--सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
जय भीम!!!
=========================================

--लोकसत्ता ऑनलाइन
--------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                      ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================