II बाबासाहेब आंबेडकर जयंती II-शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, April 14, 2023, 10:33:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II बाबासाहेब आंबेडकर जयंती II
                            ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०४.२०२३-शुक्रवार आहे. आज  "बाबासाहेब आंबेडकर जयंती" आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, काही शुभेच्छा. 

                    भीम जयंती २०२3 स्टेटस--

=========================================
--ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे,
कारण पैशाचे रक्षण
तुम्हाला करावे लागते;
परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते.

--लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा
लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि
सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात
न घेता लेखणी हातात घेऊन
अन्यायावर मात करा.

--अस्पृश्यता जगातील सर्व
गुलामगिरीपेक्षा
भयंकर व भिषण आहे.

--तुम्ही वाघासारखे बना
म्हणजे तुमच्या
वाट्याला कोणीही जाणार नाही.

--यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक आहे.

--ज्याला दुःखातून सुटका पाहिजे
असेल त्याला लढावे लागेल,
आणि
ज्याला लढायचे असेल त्याला
अगोदर शिकावे लागेल,
कारण ज्ञानाशिवाय लढलात तर
पराभव निश्चित आहे.
सेवा जवळून,
आदर दुरून
आणि ज्ञान आतून असावे.

--इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा
त्यांच्यातील सदगुण शोधावे.
=========================================

--लोकसत्ता ऑनलाइन
-------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                      ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.04.2023-शुक्रवार.
=========================================