ती बारीक हसल्यावर

Started by NARAYAN MAHALE KHAROLA, April 15, 2023, 12:36:44 PM

Previous topic - Next topic

NARAYAN MAHALE KHAROLA

ती बारीक हसल्यावर.

साडेचारच्या टायमात ती,
कँटीनमध्ये बसायची.
बोलता बोलता मैत्रिणीत,
सहज बारीक हसायची.
तिले बघण्यासाठी मग,
मित्र आमचे जमायचे.
चहाले फुंका मारून मारून,
सारेजण दमायचे.
मी दुरूनच तिले बघायचो,
तिचे ध्यान नसल्यावर.
अन खरंच किती छान वाटते,
ती बारीक हसल्यावर.

एकदातरी यावा म्हतलं,
टाइम तिच्या बिलाचा.
हसून आनंद घेत होती,
ती फेसबुकच्या "रीला" चा.
चोरून बघता बघता आमची,
नजर मग "एक" झाली.
चोरटी मायी नजर मग,
क्षणार्धात "नेक" झाली.
मग मी वागलो असा,
जसा सज्जन अंगात धसल्यावर.
अन खरंच किती छान वाटते,
ती बारीक हसल्यावर.

एक दिवस जवळ येऊन,
चहा पितोस का "गवती" म्हणे.
अन तुझ्याकडून खरंच मला,
ही अपेक्षा नव्हती म्हणे.
मित्रांसोबत तु पण,
माझ्या मैत्रीनींना छेडायचास,
हसून मला  खिदी-खीदी,
तु मित्रांकडून भिडायचास.
बंद कर छेडणं म्हणे,
मी चहा पीत बसल्यावर.
कधी-मधी चालेल म्हणे,
बाजूला कुणी नसल्यावर.
अन खरंच किती छान वाटते,
ती बारीक हसल्यावर.

"ती बारीक हसल्यावर" हा कवितासंग्रह google play Store ला उपलब्ध आहे. किंमत फक्त 3 रु.

कवी: नारायण महाले, खरोळा, वाशिम.